बी. रघुनाथ पुरस्कार किरण येले यांना प्रदान

औरंगाबाद ,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांच्या ६८ व्या स्मृती दिनी “नाथ संध्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा बी. रघुनाथ पुरस्कार किरण येले यांना “तिसरा डुळा” या कथा संग्रहासाठी बहाल करण्यात आला.
हा पुरस्कार सुप्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.पाहुण्यांचे हस्ते दिपप्रज्वलन व बी. रघुनाथ यांच्या प्रतिमेचे पुजन होवून कार्यक्रमास सुरवात झाली.प्रास्ताविक प्रा. मोहन फुले यांनी केले.तर पाहूण्यांचे स्वागत नंदकिशोर कागलीवाल यांनी केले तसेच त्यांनी आयोजनामागची भुमिका मांडली.

सत्काराला उत्तर देताना किरण येले यांनी आपल्या लेखनाच्या प्रेरणा स्पष्ट केल्या. बी. रघुनाथ सारख्या लेखकाची नाळ सादत हसन मंटो सारख्यांशी कशी जुळते हे त्यांनी सांगितले.अनुराधा पाटील यांनी किरण येले यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी तर आभार शिव फाळके यांनी मानले.