शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 औरंगाबाद, दि.17 :-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुलमंडी येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे, बाळासाहेब अमर रहे, शिवसेनाप्रमुखांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला. असंख्य बाळासाहेबप्रेमींनी यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन पुष्पगुच्छ वाहत अभिवादन केले.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले. शिवसेनाप्रमुखांनी कधीच जातपात न मानता माझ्यासारख्या लाखो सर्वसामान्य शिवसैनिकांच्या आयुष्याला उंचावर नेऊन ठेवले.केंद्रातील काही नतद्रष्ट व राज्यातील विघ्नसंतोषी लोकांना शिवसेना सत्तेत असल्याने रहावत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी शिवसैनिकांनी भक्कमपणे उभे राहून एकजुटीने प्रत्युत्तर देण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, नगरसेवक सचिन खैरे, सुरेश पवार, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, उपशहर संघटक रुख्मिनी पवार, घाटी अभ्यागत समितीचे नारायण कानकाटे, शाखाप्रमुख सचिन ढोकरट, सचिन लखासे, बाळासाहेब वाघ, व्यापारी आघाडीचे मनीष भारुका, महेश घोगते  आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  शिवतीर्थ, मुंबई येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिवादन केले. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाठ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.