हॉकी- अॅथलेटिक्स खेळांचे प्रशिक्षक द्या

पंकज भारसाखळे यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद,२० ऑगस्ट /प्रतिनिधी :-नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचे केंद्र भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे देण्यात आले. मात्र, दोन महिन्यांपासून येथे हॉकी आणि अॅथलेटिक्स या खेळांसाठी प्रशिक्षक नसल्याने ते उपलब्ध करून देण्याची मागणी हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अॅथलेटिक्सचे सहसचिव तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तथा अन्य अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
औरंगाबाद स्थित साई केंद्रात नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचे केंद्र देण्यात आले. येथे हॉकी, अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, व्हेट लिफ्टिंग आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.  दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद साई येथे कर्तव्यावर असलेल्या अॅथलेटिक्स आणि हॉकी या खेळाच्या प्रशिक्षकांनी बदली करण्यात आली होती. मात्र त्यांच्या जागेवर नव्या प्रशिक्षकांनी नेमणूक करण्यात आलेली नसल्याने या जागा रिक्त आहेत. परिणामी, या खेळाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या सुमारे दोन डझन खेळाडूंना कोणत्याही प्रशिक्षकाशिवाय सध्या सराव करावा लागतो आहे. हा विषय त्यांच्या कारकिर्दीला  बाधक ठरू शकणारा असल्याने, या रिक्त जागांवर त्वरित प्रशिक्षकांनी नेमणूक करण्याची मागणी हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अॅथलेटिक्सचे सहसचिव तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी पत्राद्वारे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. या पत्राची प्रत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, साईचे महासंचालक, औरंगाबाद स्थित संचालक विरेंद्र भांडारकर यांना या पत्राची प्रत देण्यात आली आहे.यावेळी औरंगाबाद अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे व उपाध्यक्ष शशिकला निळवंत तसेच औरंगाबाद हॉकी संघटनेचे शेख साजिद आणि डॉ.प्रदीप खांड्रे यांची प्रमुख उपस्थिती  होती.