बालकांमध्ये खेळ आणि पोषणाबद्दल जागृती निर्माण केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले बजरंग पुनिया यांचे कौतुक

नवी दिल्‍ली:-बालकांमध्ये खेळ आणि पोषणाबद्दल जागृती निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे कौतुक केले.

बजरंग पुनिया यांच्या एका ट्विटर संदेशाला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान म्हणतात,

“मुलांसाठी हा अतिशय आवडता कार्यक्रम असेल, इतकेच नव्हे तर खेळाच्या सोबतच जीवनात पुढे जाण्याची प्रेरणाही त्यांना यातून मिळेल. @BajrangPunia जी, आपल्या या प्रयत्नांमुळे पोषणाबद्दलही त्यांच्यात एक नवी जागरूकता उत्पन्न्न होईल.”