अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी यांची बदली ,मॅटमध्ये आव्हान

औरंगाबाद,१९ ऑगस्ट /प्रतिनिधी:-
अन्न व औषधी विभागातील बदल्यांमध्ये पसंतीक्रमानुसार बदली न करण्यात आल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात आव्हान देण्यात आले आहे. जालना येथील अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी यांनी प्रकरणात अर्ज दाखल केला आहे.  सुनावणीअंती, न्यायाधीकरणाचे सदस्य न्या. व्ही. डी. डोंगरे यांनी राज्य शासन, अन्न व औषधी विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त व इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आणि शपथपत्र दाखल करण्यास सांगितले. तोपर्यंत अकोला, यवतमाळ आणि औरंगाबाद येथील अन्न सुरक्षा अधिकाºयाचे पद रिक्त ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले.
  अर्जदार हे प्राध्यान क्रमानुसार अपंग श्रेणी मध्ये येत असल्यामुळे त्यांनी अकोला, यवतमाळ आणि औरंगाबाद येथे बदली करण्यासाठी पसंती क्रम दिला होता. मात्र त्यांचा पसंती क्रम डावलून त्यांची बदली बीड येथे करण्यात आली.  ही कृती तरतूदींचे उल्लंघन करणारी असल्याची बाजू अर्जदाराच्यावतीने अ‍ॅड. चाळक-पाटील यांनी केला. अर्जावर येत्या २३ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.