सम्राटनगर येथे होणार खुले गार्डन : आमदार संजय शिरसाट

आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

Displaying WhatsApp Image 2021-08-10 at 12.10.34 PM.jpeg

औरंगाबाद ,१०ऑगस्ट /प्रतिनिधी :- आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते सातारा अंतर्गत सम्राटनगर, पेशवेनगर येथे सिमेंट काँक्रिटिकरण रस्त्याचे व स्व. मीनाताई ठाकरे उध्यानाच्या संरक्षण भिंत बांधणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार शिरसाट म्हणाले की, सम्राटनगर येथील खुल्या जागेच्या भोवती संरक्षण भिंत बांधून आतमध्ये हॉलिबाल कोर्ट, नागरिकांसाठी सिमेंट बेंच, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहोत, सातारा-देवळाईचा मी कायापालट करण्याचा पूर्ण प्रत्यन करत आहे, लवकरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येत आहे, तसाच रस्ते, ड्रेनेज व इतर सुखसुविधा नागरिकांना देण्याचा प्रत्यन करत आहे.

यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत,सा.बा. अशोक येळीकर, तनपुरे, विभागप्रमुख रंजीत ढेपे,  शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, गजू शिंदे, सुरेश बाहुले, संजय भुजबळ, प्रदीप जाधव, शिवाजी शिंदे, दुष्यंत मुळे, आशुतोष पाटील, बोडखे, बाळासाहेब गायकवाड, अदवंत, येळम्बकर, महिलांमध्ये पोर्णिमा भुजबळ आदींची उपस्थिती होती.