महाआवास योजनेत उत्कृष्ट कार्य केलेल्या गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

औरंगाबाद,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील महाआवास योजनेत उत्कृष्ट कार्य केलेल्या गावांना पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज महाआवास अभियान पुरस्कार सोहळा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी  नीलेश गटणे,  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे तसेच जिल्हा परिषद, पंचायती समिती, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Displaying 18.पुरस्कार.JPG

महाआवास अभियान (ग्रामीण) मधील प्रत्येक उपक्रमात जिल्ह्याने चांगले काम केले आहे. राज्यातील उत्कृष्ट पाच जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या महा आवास अभियानांतर्गत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुके- खुलताबाद (प्रथम), सिल्लोड(व्दितीय), कन्नड- (तृत्तीय), सर्वोत्कृष्ट क्लस्टर- अजिंठा ता. सिल्लोड (प्रथम), कुंजखेड ता. कन्नड (व्दितीय), हतनुर ता. कन्नड (तृत्तीय), सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत – सावळदबारा ता. सोयगाव (प्रथम), जळकीघाट ता. सिल्लोड (व्दितीय), शिंदेफळ ता. सिल्लोड (तृत्तीय),

            राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुके- खुलताबाद (प्रथम), फुलंब्री (व्दितीय), गंगापूर (तृतीय)

  सर्वोत्कृष्ट क्लस्टर- सावळदबारा ता. सोयगाव (प्रथम), उंडणगाव ता. सिल्लोड (व्दितीय), प्रिंप्री  ता. औरंगाबाद (तृतीय)

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत – माळेगाव पिंप्री ता. सोयगाव (प्रथम), उंडनगाव ता. सिल्लोड (व्दितीय), मलकापूर ता. गंगापूर (तृतीय).

अभियान कालावधीत पंचायत समिती वैजापूर येथे  प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) -907 तसेच राज्य पुरस्कृत योजना-225 असे एकूण 1132 घरकुले,  ग्रामपंचायत खंडाळा, ता. वैजापूर येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – 64 घरकुले, ग्रामपंचायत हळदा ता. सिल्लोड येथे राज्य पुरस्कृत योजना (ग्रामीण) अंतर्गत 65 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली.