खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्यांना प्रोत्साहित करावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२३ जुलै /प्रतिनिधी :- जपानमध्ये होत असलेल्या ऑलंपिक मध्ये देशाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. त्यांच्यामधील उत्साह वाढविण्यासाठी  समाजातील सर्व घटकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

Displaying IMG_20210723_070539.jpg

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरिच ब्यूरो, औरंगाबाद व सायकलिस्ट असोसिएशन औरंगााबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

Displaying IMG_20210723_070602.jpg

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद व सायकलिस्ट असोसिएशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरात I#Cheer4India Tokyo 2020 अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 06.30 वाजता मोंढा नाका ब्रिज पासून या रॅलीस सुरुवात झाली. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडियाचे संचालक वीरेंद्र भांडारकर, सायकलिस्ट फाउंडेशन, औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर गोकुळ तांदळे आणि क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबादचे प्रबन्धक, संतोष देशमुख यांनीही सायकल रॅलीला झेंडा दाखवला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोचे प्रबंधक  संतोष देशमुख यांनी केले. या सायकल रॅलीतील सहभागींना क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो तर्फे I#Cheer4India Tokyo 2020 छापलेल्या टिशर्टचे वितरणही करण्यात आले.

Displaying IMG_20210723_070636.jpg

कार्यक्रमाच्या यशस्‍वितेकरिता फिल्ड आउटरिच ब्युरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार व सायकलिस्ट फाउंडेशन, औरंगाबादचे रूपेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.