प्रलंबित अर्णब गोस्वामी व कंगना राणावत प्रकरणांवरील अहवाल सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई ,६जुलै /प्रतिनिधी :- विधानपरिषद सदस्य प्रा.डॉ.मनीषा कायंदे व भाई जगताप यांनी अर्णब गोस्वामी, संपादक, वृत्त निवेदक व कार्यक्रम सूत्रसंचालक रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनी यांचेविरुध्द दिनांक ०८ सप्टेंबर, २०२० रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण तसेच विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी हिंदी सिनेअभिनेत्री कंगना राणावत यांचेविरुद्ध दिनांक ०८ सप्टेंबर, २०२० रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण या दोन प्रकरणांवरील विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानपरिषद नियम १७८ च्या पोट-नियम (१) च्या परंतुकान्वये पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देणारा प्रस्ताव विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला. याबाबत समिती प्रमुख, विधानपरिषद विशेषाधिकार समिती प्रा.डॉ.मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला होता