महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ व गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची जोरदार निदर्शने

नांदेड,१९ जून /प्रतिनिधी :-  वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदे, इंधन दरवाढ व गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढीच्या निषेधार्थ आज काँग्रेसने जोरदार निदर्शने केले.

नांदेड जिल्ह्यात शिवसेना काँग्रेसला टक्कर देणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता.

इंधनासोबतच जिवनावश्यक वस्तू व गॅस सिलेंडरच्या होणार्‍या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने आयटीआय चौकात आज जोरदार आंदोलन केले.

“राहुलजी लाओ, देश बचाओ” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.