शिवसेना शिंदे गटाच्या वैजापूर तालुकाध्यक्षपदी राजेंद्र साळुंके तर शहराध्यक्षपदी पारस घाटे

वैजापूर,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून अशी अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे शिवसेनेचा प्रभाव क्षेत्रात पक्ष संघटना बांधणीवर आता शिंदे गटाने लक्ष दिले आहे. वैजापूरचे तालुकाप्रमुख पदावर राजेंद्र साळुंके तर शहरप्रमुख पदाची जबाबदारी पारस घाटे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची अधिकृत घोषणा आ.रमेश बोरनारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली.

दरम्यान या घोषणेमुळे शिंदे सेना संघटनेन पक्षसंघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. ठाकरे सेनेत, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप तसेच राजेंद्र सांळुके शहरप्रमुख म्हणून कार्यरत होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्ष बंडात आ.रमेश बोरनारे यांच्या समर्थनार्थ जगताप व सांळुके यांनी उघड भुमिका घेतल्यामुळे उध्दव ठाकरे सेनेने उपजिल्हा प्रमुख पदावर अविनाश गलांडे, तसेच शहरप्रमुखपदी राजेंद्र सांळुके यांची नवीन नियुक्ती करुन या दोन्ही बोरनारे समर्थकांना पदावरुन बेदखल करण्याची भुमिका घेतली होती. त्यामुळे आ. बोरनारे यांच्या शिफारशी वरुन शिंदे सेनेत राजेंद्र सांळुके यांच्याकडे पक्ष संघटनेत तालुक्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल दोन्ही पदाधिका-यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले.