एलएमएस ज्वेलर्सला तब्बल ४० लाख १८ हजारांचा गंडा घालणाऱ्या कारागिराचा नियमित जामीन फेटाळला 

औरंगाबाद,१९जून/प्रतिनिधी

दागिने बनविण्‍यासाठी दिलेल्या सोन्यापैकी ८४५ ग्रॅम सोने परस्‍पर विक्री करुन एलएमएस ज्वेलर्सला तब्बल ४० लाख १८ हजारांचा गंडा घालणाऱ्या  कारागिराने सादर केलेला नियमित जामीन अर्ज मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी शनिवारी दि.१९ फेटाळून लावला. अमरचंद प्रेमराज सोनी (४४, रा. उत्‍तरदाबास, नापासर बिकानेर राजस्‍थान, ह.मु. पानदरीबा सिटीचौक) असे आरोपीचे नाव आहे.

Lalchand Mangaldas Soni Gems&Jewellers Pvt Ltd, Jalna Road Aurangabad -  Jewellery Showrooms in Aurangabad-Maharashtra, Aurangabad-maharashtra -  Justdial

या प्रकरणात एलएमएस ज्‍वेलर्सचे मालक उदय हरिदास सोनी (४२, रा. समर्थनगर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीची लालचंद मंदगलदास सोनी नावाची फर्म आहे. त्‍याफर्म मध्‍ये अमरचंद हा कारागीर म्हणुन काम करत होता. १ एप्रिल २० पासून ४ जून २१ या काळात पेढीचे मालक उदय सोनी यांनी आरोपी अमरचंद याला दागिने बनविण्‍यासाठी तीन किलो २७९ ग्रॅ. ४९० मिली ग्रॅ सोने दिले होते. त्यापैकी दोन किलो ४३३ ग्रॅ.५९० मिली ग्रॅ वजनाचे दागिने त्‍याने बनवून दिले. तर उर्वरित ८४५ ग्र.९००मि. सोन्या बाबत आरोपी अमरचंद हिशोब देत नव्‍हता. वारंवार विचारणा केल्यानंतर अमरचंद याने कर्जबाजारी झाल्‍यामुळे ते सोने विक्री करुन लोकांची देणे दिले आता माझ्याकडे पैसे नसल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला १५ जून रोजी पोलिसांनी अटक केली तर न्‍यायालयाने त्‍याला आजपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्‍याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले. त्‍यानंतर आरोपीने नियमित जामीनासाठी अर्ज सादर केला होता. या प्रकरणात सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी काम पाहिले.