नांदेड जिल्ह्यात 201 व्यक्ती कोरोना बाधित ; 4 जणाचा मागील दोन दिवसात मृत्यू

नांदेड ,२७मे /प्रतिनिधी :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 236 अहवालापैकी 201 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 104 तर अँटिजेन तपासणीद्वारे 97 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 88 हजार 827 एवढी झाली असून यातील 84 हजार 964 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 535 रुग्ण उपचार घेत असून 53 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक 26 मे 2021 रोजी आश्विनी कोविड रुग्णालय येथे हाय कॉलनी नांदेड येथील 72 वर्षाची महिला, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे देगलूर तालुक्यातील तंबलूर येथील 69 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 53 वर्षाचा पुरुष, दिनांक 27 मे रोजी बिलोली तालुक्यातील दुगाव येथील 49 वर्षाचा पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 872 एवढी आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 50, देगलूर तालुक्यात 4, किनवट 8, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 9, धर्माबाद 3, लोहा 2, उमरी 1, भोकर 5, हिमायतनगर 3, मुखेड 4, हिंगोली 3, बिलोली 2, कंधार 1, मुखेड 7, परभणी 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 53, बिलोली 2, लोहा 1, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 15, हदगाव 3, माहूर 1, परभणी 1, अर्धापूर 1, कंधार 2, बारड 7, हिंगोली 1, भोकर 3, किनवट 3, मुखेड 3 असे एकूण 201 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 240 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, भोकर कोविड केअर सेंटर 16, मुखेड कोविड रुग्णालय 6, अर्धापूर तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 55, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 7, माहूर तालुक्यांतर्गत 9, किनवट कोविड रुग्णालय 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 90, धर्माबाद कोविड केअर सेंटर 10, माहूर तालुक्यांतर्गत 6, लोहा तालुक्यांतर्गत 4 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज 1 हजार 535 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 48, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 39, बारड कोविड केअर सेंटर 10, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 6, कंधार कोविड केअर सेंटर 3, माहूर कोविड केअर सेंटर 3, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 6, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 12, मुदखेड कोविड केअर सेंटर 16, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 8, एनआरआय कोविड केअर सेंटर 20, मांडवी कोविड केअर सेंटर 14, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 427, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 844, खाजगी रुग्णालय 161 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 28 हजार 26

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 28 हजार 400

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 88 हजार 827

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 964

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 872

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.65 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-38

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-55

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-201

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 535

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-53