भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 136.66 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

  • गेल्या 24 तासात लसीच्या 62 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
  • कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.38%, मार्च 2020 पासूनचा सर्वाधिक दर
  • गेल्या 24 तासात 7,145 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
  • भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या (84,565) 569 दिवसातली सर्वात कमी संख्या
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.62%) गेले 34 दिवस 1% पेक्षा कमी

नवी दिल्ली,१८ डिसेंबर/प्रतिनिधी:- आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 62,06,244 मात्रा देऊन , भारतातील कोविड-19  लसीकरण व्याप्तीने 136.66 कोटी (1,36,66,05,173) मात्रांचा टप्पा पार केला. 1,43,67,288 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 8,706 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,41,71,471 झाली आहे.परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा  दर 98.38% इतका आहे, जो मार्च 2020 पासून सर्वाधिक आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित  प्रयत्नांमुळे गेल्या 51 दिवसांपासून दररोज 15,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे.गेल्या 24 तासात 7,145 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 84,565 असून ही  569 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.24% आहे आणि  हे प्रमाण मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 12,45,402 चाचण्या करण्यात आल्या.  भारताने आतापर्यंत एकूण  66.28 कोटींपेक्षा जास्त  (66,28,97,388)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  0.62% असून गेल्या 34 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.57% असून गेले सलग 75  दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आणि गेले 110 दिवस 3% पेक्षा कमी राहिला आहे.