आईच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले ११ हजार १११ रुपये

मुंबई, दि. १२ : नवशक्ती दैनिकाचे सहायक संपादक प्रकाश सावंत यांच्या मातोश्री सुलोचना सावंत यांचे १८ मे रोजी निधन झाले. अंत्यसंस्कारानंतर सामाजिक भान जपत त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ ११ हजार १११ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड खात्यात जमा केली. त्याचबरोबर प्रकाश यांनी कुर्ला येथे तर त्यांचे भाऊ प्रविण यांनी बोरिवली येथे रक्तदानही केले. सहायता निधीत रक्कम जमा केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार व्यक्त करताना सावंत परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *