नांदेड जिल्ह्यात 205 व्यक्ती कोरोना बाधित ; 3 जणाचा मृत्यू

नांदेड,२५ मे /प्रतिनिधी :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 688 अहवालापैकी 205 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 136 तर अँटिजेन तपासणीद्वारे 69 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 84 हजार 414 एवढी झाली असून यातील 84 हजार 499 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 609 रुग्ण उपचार घेत असून 66 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक 24 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे व्यंकटेशनगर उमरी येथील 75 वर्षाचा पुरुष, विजयनगर नांदेड येथील 44 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील हलदव येथील 55 वर्षाच्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 863 एवढी आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 77, देगलूर 2, लोहा 2, उमरी 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 7, धर्माबाद 2, मुदखेड 2, अदिलाबाद 2, अर्धापूर 4, किनवट 19, मुखेड 1, यवतमाळ 3, धर्माबाद 2, माहूर 1, नायगाव 8, हिंगोली 2 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 5, हदगाव 9, मुखेड 8, परभणी 1, अर्धापूर 4, कंधार 1, नायगाव 4, भोकर 3, किनवट 1, उमरी 1, धर्माबाद 3, मुदखेड 28, हिंगोली 1 असे एकूण 205 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 212 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 9, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुगणाय 6, अर्धापूर तालुक्यांतर्गत 14, लोहा तालुक्यांतर्गत 40, बारड कोविड केअर सेटर 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, भोकर तालुक्यांतर्गत 7, बिलोली तालुक्यांतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 4, माहूर तालुक्यातर्गंत 9, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 22, मांडवी कोविड केअर सेंटर 9, हिमायतननगर तालुक्यातर्गंत 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णाय 48 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.आज 1 हजार 609 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.