राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे नांदेडच्या गोदावरी नदी पात्रात विसर्जन

May be an image of 2 people, people standing and text that says 'करणसिंह बैस प्रेस फोटोग्राफर A'

नांदेड ,२५ मे /प्रतिनिधी :-– काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे आज नांदेडच्या गोदावरी नदी पात्रात विधीवत विसर्जन करण्यात आले.

May be an image of 1 person, car and road


करोना आजारावर मात केल्यानंतर उपचार सुरू असताना खा. राजीव सातव यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. आज त्यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानापासून अस्थिकलश यात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्प अर्पण करून नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

May be an image of outdoors and text that says '!!करणसिंह बैस!! प्रेस फोटोग्राफर E PB11CB85:2 0012'

या यात्रेत राज्याच्या शिक्षणमंत्री व हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह कुटुंबातील त्यांच्या आई माजी मंत्री रजनी सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, मुलगा पुष्कराज हे सहभागी झाले होते. अस्थिकलशाची विधीवत पूजा करून नांदेड येथील काळेश्वर मंदिर परिसरातल्या गोदावरी नदीत विसर्जन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षासह त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

May be an image of 1 person, standing, flower and outdoors


दरम्यान, काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी हे आज कळमनुरी दौर्‍यावर येणार होते; परंतु त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला. पुढच्या आठवड्यात ते कळमनुरी येथे जाण्याची शक्यता आहे.