देशातील सक्रिय कोविड – 19 रुग्णसंख्या 3,31,146

दिल्ली-मुंबई, 16 जुलै 2020

कोविड – 19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्य सरकार /केंद्रशासित प्रदेशांसह “संपूर्ण सरकार“ द्वारा रणनिती अंतर्गत एक श्रेणीबद्ध प्रतिबंधात्मक, कार्यक्षम दृष्टीकोन स्वीकारला गेला आहे. सामूहिक प्रयत्नांचे उच्च स्तरावर नियमितपणे पुनरावलोकन केले जाते आणि त्यांचे परीक्षण केले जाते.

याबाबतीत लक्ष्य केल्या गेलेल्या उपायांमुळे सक्रिय प्रकरणांच्या संख्येत निरंतर घट होण्यास हातभार लावण्यात आला आहे. आजच्या तारखेला, देशभरामध्ये कोविड – 19 चे सक्रिय रुग्ण  3,31,146 इतके आहेत.  हे आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी एकतृतीयांश पेक्षा थोडे जास्त (34.18 टक्के) प्रमाण आहे. रुग्णसंख्येचा प्रभाव अधिक असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबांत्मक उपाययोजना, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण, क्षेत्रीय नियंत्रण उपाययोजना, संपर्कात आलेल्या व्यक्ती वेळीच ओळखणे, प्रभावी रुग्णसंख्या असलेल्या परिसरात सर्वेक्षण करणे, प्राधान्याने चाचणी, वेळेत झालेले निदान आणि रुग्ण बरे करण्यामध्ये परिणामकारक प्रयोगशालेय व्यवस्थापन यामुळे वास्तविक देशात कोविड – 19 ची रुग्णसंख्या ही मर्यादित राहिली आहे आणि व्यपस्थापन करण्यायोग्य आहे आणि रुग्णाची काळजी घेण्यातील नियमांचे काटेकोर पालन झाल्यामुळे रुग्णांची बरे होण्याची शक्यता देखील वाढली आहे.   

राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे चाचणी क्षमता वाढविली, आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ, एसएआरआय किंवा आयएलआय सारख्या रुग्णांबाबत प्राधान्याने सर्वेक्षण, आणि वृद्ध लोक आणि सहरोगी या लोकांचा शोध सुनिश्चित केल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये रुग्ण बरे होण्याच्या दराम्ये वाढ झाली आहे.

आलेखामध्ये दाखविल्यानुसार, जून 2020 च्या मध्यापासून 50 टक्के बरे होण्याचा दर पार केल्यानंतर, रुग्णांच्या बरे होण्यात सातत्याने वाढ झालेली दिसून येते आणि सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. एकूण कोविड – 19 रुग्णांपैकी 63.25 टक्के  रुग्ण पूर्वीच बरे झाले आहेत, त्या बरोबरीने सक्रिय रुग्णांमध्ये स्थिरपणे उतार दिसतो, तो साधारणपणे जून 2020 च्या मध्यापासून 45 टक्के होता तो आतापर्यंत साधारणपणे 34.18 टक्के आहे.

एकूण 6,12,814 रुग्णांपैकी गेल्या 24 तासात 20,783 रुग्ण  कोविड – 19 मधून बरे झाले आहेत. कोविड – 19 चे सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यामधील अंतर आता 2,81,668 इतके झाले आहे.

कोविड – 19 साठी समर्पित असलेल्या रुग्णालयांपैकी दर्जा एक असलेली 1381 रुग्णालये आहेत, 3100 कोविड आरोग्य केंद्रे दर्जा दोन मध्ये कोविड साठी समर्पित आहेत, तर 10,367 कोविड आरोग्य केंद्र हे दर्जा तीनमध्ये आहेत. या दोन्हीमध्ये अतिदक्षता विभागात 46,666 खाटांची सुविधा आहे.

केंद्र आणि राज्ये यांच्या सहकार्याने केलेल्या धोरणानुसार हे देखील सुनिश्चित झाले आहे की कोविड रुग्णांच्या संख्येवर आता प्रतिबंध येत आहे. देशभरातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी 48.15 टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यात  आहेत. एकूण 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील केवळ 10 राज्यात देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 84.62 टक्के हिस्सा आहे. केंद्र सरकार या राज्यांना बाधित व्यक्तींच्या नियंत्रण आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या बाबतीत सतत सहकार्य करीत आहे.

24 तासात 3.26 लाखापेक्षा अधिक नमुन्यांची चाचणी

`चाचणी, शोध, उपचार (टेस्ट, ट्रेस, ट्रीट)“ या रणनितीनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाचण्यांसाठी केंद्र सरकार पुढाकार घेत आहे. मिळालेल्या परिणामानुसार, देशभरात चाचणी प्रयोगशाळांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढलेली चाचणी आयसीएमआर मार्गदर्शक तत्वांनुसार आहे आणि त्यामुळे रुग्ण शोधण्यास लवकर मदत झाली आहे.

कोविड – 19 च्या चाचणीमधील आरटी – पीसीआर या महत्त्वाच्या मानकांसह चाचण्या केल्या जात आहेत. अर्ध्या तासाच्या आत निकाल देणारी’ रॅपिड अँटिजेन पॉइंट ऑफ केअर’ चाचणीचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे . यामुळे रुग्णसंख्येचा प्रभाव अधिक असलेल्या आणि बाधित क्षेत्रात चाचणीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे संसर्ग पसविण्यात प्रभावीपणे मदत होऊ शकली आहे.

आता नोंदणीकृत सर्व वैद्यकीय प्रॅक्टिशनर्सना चाचणीची परवानगी देण्यात आली असून,  आरटी – पीसीआर, ट्रू नॅट आणि सीबीएनएएटी यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोठ्याप्रमाणावर चाचण्या करणे शक्य झाले आहे.

गेल्या 24 तासात 3,26,826  नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. एकूण 1,27,39,490 नमुन्यांची चाचणी केली गेली तर प्रति दशलक्ष 9231.5 चाचण्या भारतात करण्यात आल्या.

देशात 1234 लॅब मुळे चाचणी प्रयोगशाळांची क्षमता आता वाढली आहे, 874 प्रयोगशाळा सरकारी क्षेत्रात आणि 360 खासगी प्रयोगशाळा आहेत. यांचाही समावेश आहे :

आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 635 (सरकारी 392 + खासगी 243)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 499 (सरकारी 447 + खासगी 52)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 100 (सरकारी 35 + खासगी 65)

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह एम्स, नवी दिल्ली येथील राजकुमारी अमृत कौर बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन झाले. यावेळी, एम्सचे संचालक प्रा. आर. गुलेरिया आणि एम्सचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि देशाच्या पहिल्या आरोग्य मंत्री राज कुमारी अमृत कौर यांच्या नावावर हा बाह्य रुग्ण विभाग सुरु केल्याबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांनी आनंद व्यक्त केला. कोविड-19 च्या विरोधात देशाच्या सामूहिक प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले की, हळू हळू आम्ही या साथीच्या रोगा विरुद्ध सुरु केलेली लढाई जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 2 टक्क्यांहून कमी कोविड बाधित रुग्ण आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत.  आपले प्रयोगशाळांचे जाळे मजबूत झाले आहे; जानेवारी 2020 पासून आज आतापर्यंत प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढत आज 1234 झाली आहे. आजपर्यंत आम्ही दररोज 3.26 पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी केली आहे. डॉ. हर्ष वर्धन पुढे म्हणाले की, येत्या 12 आठवड्यांत ही क्षमता दररोज 10 लाख चाचण्यांपर्यंत वाढविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *