राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत स.भु जालनाच्या ओमेशा अहिरेचे यश

जालना ,१३ मे /प्रतिनिधी

एसआयपी (SIP )मार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत जी.एम.ए. या लेवल मध्ये जालन्याचा ओमेशा तुषार अहिरे हिने सर्वद्वितीय क्रमांक पटकावला. ती सरस्वती भुवन ,जालनाची विद्यार्थिंनी आहे.

कोरोना महामारीच्या जागतिक संकटात सगळीकडे भीतीदायक वातावरण असताना मुले घरात बसून कंटाळत आहेत. एसआयपी (SIP )मार्फत विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी विविध पातळ्यांवर स्पर्धा आयोजित केल्या जातात.परंतु या वर्षी प्रत्यक्ष हे शक्य होईल असे वाटत नव्हते,त्यात स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली.ही स्पर्धा एकूण तीन पातळ्यांवर घेण्यात आली. प्रथम पातळीत स्थानिक स्पर्धक होते त्यात यशस्वी झालेले स्पर्धक राज्य पातळीसाठी निवडल्या गेले.राज्य पातळीत यशस्वी स्पर्धकांची राष्ट्रीय ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली यात औरंगाबाद जिल्ह्यातील बऱ्याच स्पर्धकांची निवड झाली होती.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशातील जवळ जवळ २२ राज्यातील स्पर्धक होते.यात जी.एम.ए. या लेवल मध्ये ओमेशा तुषार अहिरे हिने सर्वद्वितीय क्रमांक पटकावला. तिला अंजुषा मालपाणी यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.तसेच मास्टर माईंड अबॅकस औरंगाबाद केंद्राच्या संचालिका राधा बजाज यांचेही मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.तसेचगणित विषयाचे शिक्षक तिचे वडील तुषार अहिरे (शिक्षक . स.भु.प्रशाला, जालना) आई प्रज्ञा अहिरे यांचेही प्रोत्साहन मिळाले.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे .