इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डच्या यंग अचिव्हर ऑफ द इअर पुरस्काराने डॉ. गोविंद भताने सन्मानित

जालना ,१६ मार्च  /प्रतिनिधी :-डॉ गोविंद भताने यांना इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डच्या वतीने देण्यात येणारा यंग अचिव्हर ऑफ द इअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सत्कार सोहळा मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधानसभा मुख्य प्रतोद आशिष शेलार व विले पार्ले विधानसभेचे आमदार पराग आळवणी यांची उपस्थिती होती.तसेच प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता मुकेश ऋषी,रणजित बेदी ,अली खान  यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.

यावेळी संपूर्ण भारतातील उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या डॉक्टरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. गोविंद भताने हे डेंटल सर्जन तसेच भाजपा वैद्यकीय आघाडी डेंटल विंगचे प्रदेश संयोजक असून अत्यंत कमी वयात त्यांनी फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही तर त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डस 2022 च्या वतीने देण्यात येणारा यंग अचिव्हर ऑफ द इअर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

डॉ गोविंद भताने यांनी केलेल्या कोरोना काळातील सेवाकार्य व संपुर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्याना मागील वर्षी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना वीर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांचे आई वडिलांना व त्यांचे मार्गदर्शक डॉ अजित गोपछडे तसेच इतरांनी मार्गदर्शन मिळाले या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील, वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. स्वप्नील मंत्री ,पॅरा वैद्यकीय विंग चे अमोल कारंजेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब कोलते, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ. संदीप चोपडे, अतिक खान, सुहास मुंडे, व इतर सर्वांनी  अभिनंदन केले