स्‍पा सेंटरच्‍या मालकाला पकडण्‍यात अखेर पोलिसांना यश

औरंगाबाद,१३ मे /प्रतिनिधी :-

स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या  कियोरा स्‍पा सेंटरच्‍या मालकाला पकडण्‍यात अखेर पोलिसांना यश आले आहे. प्रसाद श्रीहरी पाटील (रा. जायफळ ता. औसा जि. लातुर) असे आरोपीचे नाव असून तो गुन्‍हा घडल्यापासून पसार होता. अखेर पोलिसांनी त्‍याला त्‍याच्‍या जायफळ या मुळ गावावरून गुरुवारी दि.१३ अटक केली. त्‍याला सोमवारपर्यंत दि. १७ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी दिले.

Heaven Spa Center, Dwarka - Body Massage Centres in Delhi - Justdial

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांना लोया चेंबर्समध्ये असलेल्या कियोरा स्पा सेंटरवर प्रसाद पाटील नावाचा व्यक्ती काही मुलींना डांबुन ठेवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने 17 ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी स्पा सेंटरवर छापा मारुन राय सोलोमन आणि झावलनेह ऑरनोराम चोरख्य या दोघा दलालांसह चार महिलांना ताब्यात घेतले होते. दोघे दलाल या चार महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. छाप्यात पोलिसांनी ९४ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणात यापूर्वी दोघा आरोपी दलालांसह एका ग्राहकाला पोलिसांनी अटक केली. तर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी तथा स्पाचा मालक प्रसाद पाटील याने गुन्ह्यात अटक होउ नये यासाठी अटकपूर्व जामीनीसाठी न्यायालयात अर्ज सादर केला असता न्‍यायालयाने तो फेटाळला होता.

आरोपी प्रसाद पाटील याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी आरोपी पाटील याने स्‍पा मधील चार पीडित महिलांना कोठून आणले, त्‍याला कोणी मदत केली, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे आहे. आरोपीकडून कियोरा स्‍पाचे लायसन्‍स, भाडेकरारनामा जप्‍त करणे आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाइल जप्‍त करणे आहे. तसेच स्‍पा मधील ग्राहकांचे नोंदणी रजिस्‍टर देखील जप्‍त करणे असून आरोपीने अशा प्रकारे आणखी कोठे कुंटणखाना चालविला याचा देखील ल तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.