गड आला पण सिंह गेला ,ममता बॅनर्जी पराभूत ,शुभेंदू अधिकारी यांचा विजय

कोलकात्ता : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि अतिशय चुरशीच्या  राहिलेल्या नंदीग्राम मतदारसंघात भाजपाचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचा विजय झाला आहे. भवानीपूर हा आपला बालेकिल्ला सोडून नंदीग्राममधून रिंगणात उतरलेल्या ममता बॅनर्जी यांना अधिकारींनी १९५६ मतांनी पराभूत केले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वात चर्चित लढत ठरली ती मुख्यमंत्री-तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी  विरुद्ध भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांची… अखेर, नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलीय. होतंय. नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री – तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांचा त्यांचेच एकेकाळचे सहकारी – भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी  यांनी तब्बल १९५६ मतांनी पराभव केलाय.
नंदीग्राम मतदारसंघाची निवडणूक इतकी चुरशीची ठरली की मतमोजणीच्या १५ व्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारींहून २७०० मतांनी पुढे होत्या. मात्र मतमोजणीच्या १६ व्या फेरीअखेरीस तृणमूल उमेदवार ममता बॅनर्जी आणि भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात केवळ ६ मतांचा फरक उरला होता. अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झालाय.
या मतदारसंघातील निवडणूक भाजपा आणि तृणमूल काँगे्रससाठी तसेच स्वत: ममता आणि अधिकारी यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. 2007 मधील हिंसाचारानंतर नंदीग्रामकडे देशाचे लक्ष गेले होते. या मतदारसंघात आतापर्यंत केवळ अधिकारी कुटुंबाचेच वर्चस्व होते. आपण ममतांचा किमान 50 हजार मतांनी पराभव करू, असा दावा शुभेंदू अधिकारी यांनी केला होता. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपाने सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आय़ोगाने पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.