जालना शिवसेना दलित आघाडीचे शिवसंपर्क सामाजिक अभियान

जालना ,२८ जानेवारी /प्रतिनिधी :- शिवसेना दलित आघाडीचे शिवसंपर्क सामाजिक अभियान शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या उपस्थितीत जिल्हाभरात दौरा सुरु केला असून अंबड तालुक्यातील पारनेर येथे २८ जानेवारी रोजी घेण्यात आला. हे अभियान शासकीय नियमांचे पालन करुन घेण्यात आला.
यावेळी तेथील नागरिकांच्या समस्या व शासकीय योजनेची माहिती दिली. या
पारनेर येथील वंचित, भुमिहिनांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. शिवसेना
दलित आघाडीच्या माध्यमातून राबविण्यात आलेले अभियान हे अत्यंत शिस्तबध्द
व शासनाचे नियमांचे पालन करुन घेण्यात आले.

यावेळी दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या अनेक समाजहिताच्या
जनकल्याणकारी योजना प्रशासकीय यंत्रणेमार्पâत राबविल्या जातात. परंतु
समाज घटकातील उपेक्षितातील वंचित घटक आज सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या
योजनांचा लाभ मिळवून देण्याचा या शिवसंपर्क  सामाजिक अभियानाचा उद्देश
असल्याचे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी
सांगितले.
यावेळी अंबड तालुक्यातील पारनेर येथील दशरथ तांबे, बबन येडे, हरिष पठाण,
अशोक येडे,भिमराव जाधव, रघुनाथ जाधव, संजय मगरे, बंडू मगरे, आरुण जाधव,
राजु जाधव, दामु मगरे, प्रकाश मगरे, बाबासाहेब मगरे, वैâलास भालेराव,
विजयाबाई मगरे,सुशिला जाधव, चंद्रकला जाधव, मिना मगरे, नंदा मगरे, आशराबी
शेख, कांचनाबाई जाधव आदींची उपस्थिती होती.