कोविड-19 चा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या औरंगाबादसह 50 पालिका क्षेत्रात केंद्रीय पथके

नवी दिल्ली, 9 जून 2020:
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविडचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळणाऱ्या 15 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील 50 हून अधिक जिल्हे / पालिका क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय केंद्रीय पथके रवाना केली असून, ही पथके कोविड-19 महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात आणि व्यवस्थापनात राज्य सरकारांना तांत्रिक आधार देऊन मदत करतील. ही राज्ये / केंद्रशासित प्रदेश याप्रमाणे: महाराष्ट्र (7 जिल्हे / नगरपालिका), तेलंगणा (4), तामिळनाडू (7), राजस्थान (5), आसाम (6), हरियाणा (4), गुजरात (3), कर्नाटक (4), उत्तराखंड (3), मध्य प्रदेश (5), पश्चिम बंगाल (3), दिल्ली (3), बिहार (4), उत्तर प्रदेश (4), आणि ओदिशा (5).या पालिकांमध्ये औरंगाबाद महापालिकाचा समावेश आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 2150 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

प्रशासकीय हाताळणी व कारभार सुधारण्यासाठी तीन सदस्यीय पथक असून त्यात दोन सार्वजनिक आरोग्य तज्ञ / साथीचे रोग विशेषज्ञ / प्रयोगशाळेतील संशोधक आणि एक संयुक्त सहसचिव स्तरीय वरिष्ठ नोडल अधिकारी यांचा समावेश आहे. हे पथक प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काम करत आहेत आणि हे पथक जिल्हा / शहरी भागातील संसर्गग्रस्तांच्या नियंत्रणावरील उपाययोजनांची अंमलबजावणी आणि कार्यक्षम उपचार / नैदानिक व्यवस्थापनात राज्य आरोग्य विभागाला मदत करण्यासाठी आरोग्य सेवा सुविधांना भेट देत आहे.

अधिक चांगले समन्वय, त्वरित कार्यवाही, अधिक बारकाईने धोरण राबविण्यासाठी या जिल्हा / नगरपालिकांनी राज्यांबरोबर सध्या संपर्कात असणाऱ्या केंद्रीय पथकांशी नियमित संपर्क साधावा असा प्रस्ताव आहे. अशा वारंवार होणा-या संवादांमुळे सर्वेक्षण, प्रतिबंध, चाचणी आणि उपचारांशी संबंधित कारवाईस अधिक बळकटी मिळते.

चाचणी करण्यात येणाऱ्या अडचणी, दर दशलक्ष लोकसंख्येमागे कमी प्रमाणात चाचण्या, उच्च पुष्टीकरण दर, उच्च चाचणी पुष्टीकरण दर, पुढील दोन महिन्यात क्षमता कमी होण्याचा धोका, खाटांची कमतरता, मृत्युदरात वाढ, रुग्णसंख्या दुप्पट होण्यात वाढ, संक्रमित रुग्णसंख्येत अचानक वाढ अशा राज्य / केंद्रशासित प्रदेश प्राधिकरणासमोरील अनेक आव्हानांचा सामना करण्यास ही केंद्रीय पथके राज्य / केंद्रशासित प्रदेशांना मदत करीत आहेत.

केंद्रीय पथकाशी नियमित संपर्क साधण्यासाठी कित्येक जिल्हे / नगरपालिकांनी यापूर्वीच जिल्हा स्तरावर वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिका-यांचा समावेश असलेले समर्पित सहाय्यक पथक नेमण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *