सिल्लोड सोयगाव तालुक्यातील ५६ ठिकाणी तलाठी कार्यालय व निवासस्थान बांधकामास मंजुरी

मुंबई, दि. 8 : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील 56 ठिकाणी तलाठी कार्यालय तसेच तलाठ्यांचे निवासस्थान बांधण्यास मंजुरी मिळाली आहे.

या कार्यालयांना हक्काची जागा मिळावी म्हणून महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विहित कार्यवाहीचे निर्देश दिले होते.

राज्यमंत्री श्री. सत्तार तलाठ्यांच्या कार्यालयाजवळ निवासस्थानाच्या बांधकामास मंजुरी मिळावी यासाठी पुढाकार घेतला. तलाठी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी सुमारे 17 कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.

तलाठी कार्यालय व निवासस्थान जवळ असल्यास तलाठी कार्यालयात उपलब्ध राहतील व जनतेसाठी  ते सोयीचे होईल. या उपक्रमाला मंजुरी मिळाल्याने याच धर्तीवर राज्यभरात असे उपक्रम राबविता येतील, असे श्री.सत्तार यांनी सांगितले.