नांदेड जिल्हा बँकेच्या खातेदारांना एटीएम द्या 

साहेबराव काळे गुरुजी धावरीकर यांची मागणी 

लोहा,२७ एप्रिल /प्रतिनिधी 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांनाची बँक आहे .ज्या प्रमाणे नॅशनल बँकेच्या दैनंदिन कारभारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो त्याच प्रमाणे जिल्हा बँक सुद्धा अपडेट व्हायला पाहिजे.गेल्या चार महिन्या पासून अतिवृष्टीचे अनुदान आले पण अल्फाबीटीकल ( इंग्रजी वर्णमाले नुसार) वाटप सुरू आहे त्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना पैसे मिळेनात .त्यासाठी शेतकऱ्यांना एटीएम कार्ड द्यावेत अशी मागणी दूरसंचार विभागाचे सल्लागार माजी सरपंच साहेबराव काळे गुरुजी यांनी केली आहे   

लोहा शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मुख्य शाखा आहे .आजूबाजूचे गावे या बॅंकेला जोडली आहेत.अतिवृष्टीचे अनुदान या बँकेत जमा होते. बँकेत खातेदार संख्या अधिकची आहे त्या तुलनेत कर्मचारी चार – पाच जण शिवाय अनेकदा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे वाटप प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरू असते.दररोज शेतकऱ्यांना ताटकळत  बसावे लागते.कधी”  ए”पासून तर कधी “झेड ” पासून उलट्या क्रमाने गावांना अनुदान वाटप केले जाते.कर्मचाऱ्यांचा दोष नाही तर बँक व्यवस्थापन अपडेट नाही असे माजी सरपंच साहेबराव काळे गुरुजी यांनी स्पष्ट केले .   

Displaying IMG_20210427_130851.jpg
साहेबराव काळे गुरुजी धावरीकर

चार चार महिने वाटप सुरू असते त्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही शासनाचा हेतू शेतकऱ्यांना वेळेवर मदत करण्याचा आहे पण जिल्हा मध्यवर्ती बँके प्रणाली मुळे तो साध्य होत नाही ही अवस्था संपूर्ण जिल्ह्यात या बँकेबाबत आहे.तेव्हा नव्या सत्तारूढ व्यवस्थापनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकऱ्यांना एटीएम द्यावेत जेणे करून शेतकऱ्यांना , खातेदारांना ताटकळत बसावे लागणार नाही शिवाय वेळेवर अनुदान मिळेल अशी मागणी जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे निष्ठावंत समर्थक माजी सरपंच साहेबराव काळे गुरुजी धावरीकर यांनी केली आहे .