शिवसेनेने उमरग्यात सुरु केले बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर

उमरगा ,२७ एप्रिल /प्रतिनिधी 

शिवसेनेच्या वतीने शहरात मीनाक्षी मंगलकार्यालय येथे १०० बेड्चे *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कोविड केअर* सेंटर आज सुरु करण्यात आले . 
सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सौम्य लक्षणे असलेल्या व ज्यांना गृह विलगिकरणाची सुविधा उपलब्ध नाही, अशा रुग्णांसाठी सर्व सुविधांयुक्त कोविड केअर सेंटरची आवश्यकता भासत असल्याने शिवसेनेच्या वतीने सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सूचना माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी सर्व शिवसैनिकांना दिल्या होत्या.

Displaying IMG-20210427-WA0352.jpg


यानुसार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते किरण गायकवाड यांनी युवा सेना व विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत टीम तयार करून अल्पावधीतच मिनाक्षी मंगल कार्यालय, उमरगा येथे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला.यासाठी शासनाकडून रीतसर परवानगी घेऊन  आज सुरुवातही करण्यात आली .
यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे नगरपरिषदेचे कर्मचारी यांना भर पेहराव आहेर करून शिवसेनेच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांचा मोफत 2 लाखांचा विमा काढून देण्यात आला. 
या कोविड केअर सेन्टरमधील रुग्णांसाठी रुग्णवाहिका, सकाळी काढा, चहा व नाश्ता तसेच दुपारी व रात्री सकस आहार देण्यात येणार आहे.तसेच रुग्णांकडून नियमित व्यायाम, तज्ज्ञ डॉकटरांकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. 

Displaying IMG-20210427-WA0356.jpg

या कार्यक्रमास माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, पालिकेतील गटनेते संतोष सगर, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, सचिन जाधव, योगेश तपसाळे, शरद पवार, खयूम चाकूरे, प्रदीप मदने, प्रशांत पोचापुरे, साई विभूते, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, विक्रम शहापुरे, ओम जगताप, अमित माने, काका गायकवाड, पंकज जगताप, हैदर शेख, प्रवीण साठे, महादू क्षीरसागर, आदी उपस्थित होते