भारतीय विकासाचा चढता आलेख

नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा

कोविड–19 महामारीमुळे जगभरातील सर्व अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे सर्वत्र मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोल बिघडला आहे. अचानकपणे जगाला बसलेल्या या आर्थिक धक्क्याला भारत काही अपवाद नाही. तरीही, जागतिक महामारीच्या आपत्तीकालीन परिस्थितीत देखील भारत सरकारने कार्यक्षमपणे वेळोवेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीची प्रेरणा तरली आहे.

Indian Economy May Rebound with 9.5% Growth Next Fiscal After 5%  Contraction This Year: Fitch Ratings

एफपीआय, एफडीआय आणि कॉर्पोरेट रोखे बाजारातील निधींच्या ओघाचा कल यांच्या मदतीने भारतीय विकासाचा आलेख चढता ठेवण्यात सरकारला यश आलेले दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सशक्तता आणि लवचिकपणा यांच्यावर गुंतवणूकदारांचा किती दृढ विश्वास आहे हेच यातून दिसून येते.

I.        एफपीआय अर्थात पोर्टफोलियोतील परदेशी गुंतवणूक

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या गेल्या दोन महिन्यात  एफपीआयद्वारे देशात गुंतवणुकीसाठी आलेल्या निधींच्या प्रमाणात मोठी वाढ होऊन त्याने उच्चांक गाठला आहे. 28 नोव्हेंबर 2020 ला एफपीआयसाठीचा निधी 62,782 कोटी रुपये होता. यापैकी ईक़्विटी मध्ये 60,358 कोटी तर डेट आणि हायब्रीड मध्ये 2,424 कोटी रुपये गुंतवण्यात आले.

राष्ट्रीय सुरक्षा ठेव मर्यादित या संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात एफपीआयमध्ये गुंतवणुकीने नोव्हेंबर महिन्यात उच्चांक गाठला.

II.        एफडीआय अर्थात थेट परदेशी गुंतवणूक

या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण 28,102 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची एफडीआय झाली. त्यामुळे, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सप्टेंबरपर्यंत एफडीआय ईक़्विटीमार्फत 30,004 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची  परदेशी गुंतवणूक झाली जी आधीच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत झालेल्या गुंतवणुकीपेक्षा 15% नी जास्त आहे असे दिसून येते. म्हणजेच, एफडीआय ईक़्विटीमध्ये 224,613 कोटी रुपयांची म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 23% जास्त गुंतवणूक झाली. या कालावधीत ऑगस्ट या एकाच महिन्यात सर्वात लक्षणीय म्हणजे 17,487 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली.केंद्र सरकारने एफडीआय धोरणात केलेले बदल, गुंतवणुकीसाठी सुविधांची उभारणी तसेच व्यवसाय करण्याचे सुलभ मार्ग यामुळे एफडीआय मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Total FDI Flows (US$ Million)

Year (Financial)FDI Equity InflowsTotal FDI Flows
2014-152973745148
2015-164000155559
2016-174347860220
2017-18 (P)4485760974
2018-19 (P)4436662001
2019-20 (P)4997774390

                        Source: DPIIT

III.        रोखे बाजार

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण 4.43 लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट रोखे वितरीत झाले जे गेल्या वर्षी याच कालावधीत वितरीत झालेल्या 3.54 लाख कोटी रुपये किमतीच्या कॉर्पोरेट रोख्यांपेक्षा 25% नी जास्त आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील नव्या सुगम सुधारणा आणि रोखतेच्या नव्या नियमांमुळे डेट बाजारातील फायदा कमी झाला.

नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा महसूल जमा

नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा झाला असून त्यामध्ये 19,189 कोटी रुपये सीजीएसटी, 25,540 कोटी रुपये एसजीएसटी, 51,992 कोटी आयजीएसटी( आयात मालावरील संकलित 22,078 कोटी रुपयांसह) आणि 8242 कोटी रुपये अधिभाराचा समावेश आहे. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत जीएसटीआर- 3बी विवरणपत्रांची एकूण संख्या 82 लाख झाली आहे.

सरकारने आयजीएसटीमधून नियमित तडजोड म्हणून 22,293 कोटी सीजीएसटी आणि 16,286 कोटी रुपये एसजीएसटी चा निपटारा केला आहे. नोव्हेंबर 2020मध्ये नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र  आणि राज्य सरकारांनी मिळवलेला एकूण महसूल 41,482 कोटी रुपये सीजीएसटी तर 41,826 कोटी रुपये एसजीएसटी आहे.

सध्या वसूल केलेल्या जीएसटी महसुलाचा कल पाहाता, नोव्हेंबर 2020 मध्ये गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 1.4 टक्के जास्त महसूल जमा झाला आहे. या महिन्यात आयात मालावरील महसूल गेल्या वर्षी याच काळातील महसुलाच्या  4.9 टक्के जास्त आहे आणि स्थानिक व्यवहारांमधून ( आयात सेवांसहित)  मिळालेला महसूल 0.5 टक्क्यांनी जास्त आहे.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये चालू वर्षातील जीएसटी महसुलाचा कल दिसून येत आहे. नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये प्रत्येक राज्यात जमा झालेल्या जीएसटीची आकडेवारी खालील तक्त्यात दिसत आहे.

रेल्वे मालवाहतूकीत 2020 मधे भरीव वाढ

भारतीय रेल्वेने ,रेल्वेच्या मालवाहतूक लाभाच्या आकडेवारीची  गती कायम ठेवली असून नोव्हेंबर 2020 या महिन्यातील मालवाहतूकही वाढली आहे.

भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत नोव्हेंबर 2020 या कालावधीत  गतवर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीत तसेच त्यावरील कमाईत वाढ झाली आहे.

नोव्हेंबर 2020 मधे भारतीय रेल्वेद्वारे 109.68 दशलक्ष मेट्रिक टन माल चढविला गेला, जो गतवर्षीच्या तुलनेत याच काळा पेक्षा 9% (100.96 दशलक्ष मेट्रिक टन) अधिक आहे. या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतूकीतून 10657.66 कोटी रुपये इतकी कमाई केली, जी गतवर्षी याच काळात झालेल्या (10207.87कोटी रुपये) कमाईपेक्षा 449.79 (4%)कोटी रुपये अधिक आहे.

नोव्हेंबर 2020 या महिन्यात 109.68 दशलक्ष मेट्रिक टन माल चढविला गेला, ज्यात 48.48 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा, 13.77 दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिज, 5.1 दशलक्ष मेट्रिक टन अन्नधान्य, 5.41 दशलक्ष मेट्रिक टन खते  आणि 6.62 दशलक्ष मेट्रिक टन सीमेंट( क्लींकर व्यतिरिक्त) यांचा समावेश आहे.

या कालावधीत नोव्हेंबर 2020 मधे दररोज सरासरी 58,726 वॅगन्स चढविण्यात आल्या, त्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत (56,128) 4.6%अधिक आहेत.

सणासुदीच्या काळातील सुट्या, निवार चक्रीवादळाचा मालवाहतूकीवर परिणाम होऊन सुद्धा भारतीय रेल्वेने गेल्या तीन महिन्यात (ऑक्टोबर 15%,सप्टेंबर 15% ) उत्साहवर्धक  आकडेवारी नोंदवत आपली आर्थिक सुधारणा स्थिर होत असल्याचे दर्शविले आहे.

रेल्वे मालवाहतूकीकडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती/सूट दिल्या गेल्या होत्या, याचा उल्लेख करायलाच हवा.

हे लक्षात घ्यायला हवे, की मालवाहतूकीवर संस्थागत आणि  आगामी शून्यावर आधारीत वेळापत्रकानुसार कार्यवाही केली जाईल.

कोविड-19 चा वापर देखील  रेल्वेने आपली सर्वांगीण कार्यक्षमता  आणि कामगिरी  सुधारण्यासाठी केला आहे