शांततामय आंदोलनात तलवारी, पोलिसांवर हल्ला

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यावरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झालेत. आंदोलक शेतकऱ्यांकडून दिल्लीत राडा घातला जातोय. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसंच तलवार हातात घेऊन पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही शेतकरी आंदोलक करतयात..शेतकऱ्यांच्या या हल्ल्यात १ पोलीस कर्मचारी जखमी झालाय. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर अडवल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. पोलिसांवर अशा पध्दतीने हल्ला करण्यात आल्यामुळे हे आंदोलन आहे की गुंडागर्दी आहे असा प्रश्न निर्माण झालाय.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. सिंघू बोर्डरवरून निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा थेट दिल्लीमध्ये घुसला. लाल किल्ल्याकडे हा मोर्चा जात असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये घमासान पाहायला मिळाले. गेली ६० दिवसा शांततेत मोर्चा काढणारे हे शेतकरी आता प्रसारमध्यम, पोलीस तसेच सामान्य नागरिकांवर तलवारी उगारू लागले आहेत. त्यामुळे, आता पुन्हा एकदा सर्व स्तरांवरून याबाबतीत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्लीत घुसणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तसेच लाठी चार्ज केला. त्यानंतर काही आंदोलकांची पोलिसांबरोबर चकमक झाली. त्यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या. ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगावर चढवण्याचादेखील प्रयत्न झाला. तलवारी बाहेर काढणाऱ्या आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिस अश्रूधुराचा वापर करण्यात आला.
 

तर दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांकडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामुळे पोलिसांकडून बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखण्यात आलं. मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्सची तोडफोड केली आहे. दिल्ली हरियाणा टिकरी बॉर्डरवर, कर्नाल बायपास इथं आंदोलकांनी बॅरिकेड्सची तोडफोड केलीय. तर दुसरीकडे मुकरबा चौक परिसरात पोलिसांच्या गाड्या आणि बॅरिकेड्सनं शेतकऱ्यांचा रस्ता अडवण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर चढून निदर्शनं केली. तर दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे वर लावलेले बॅरिकेड् हटवत शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केला आहे.