शिवदास ढवळे आत्मदहन प्रकरण :माळाकोळी पोलिसानी  दोन  आरोपीना केले  अटक ; चार अद्यापही फरार

लोहा,४ मे /प्रतिनिधी      

एखादी घटना सामाजिक दृष्टया अतिसंवेदनशील असतानाही पोलिसांची यंत्रणा कशी  ढिम्मी असते याचा अनुभव  चौंडी येतील आत्मदहन करणारे सामाजिक कार्यकर्ते मृत  शिवदास ढवळे यांच्या कुटुंबियांना व रिपब्लिकन कार्यकर्त्याना येतो आहे.माळाकोळी पोलिसांनी घटने नंतर तब्बल पाच  दिवसात  प्रकरणातील फक्त दोन आरोपीना  अटक केली. ५ तारखे पर्यन्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर चारजण अद्याप फरार आहेत स्वतः जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या चोंडी भेटीत  ढवळे  कुटुंबियांना सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले होते पण अद्याप माळाकोळी पोलिसांना यश आले नाही.
लोहा तालुक्यातील माळाकोळी सर्कल मधील चोंडी  या गावात आंबेडकरीं चळवळीतील   सामाजिक कार्यकर्ता शिवदास ढवळे यांनी  २८एप्रिल रोजी आत्मदहन केले  ही खळबळजनक घटनेमुळे जिल्ह्यात हे प्रकरण चर्चेला आहे .    वन विभागाने  चार  हरीण व दहा मोरांच्या  हत्येची  , माती नाला यांची चौकशीच्या करावी,  याससाठी जून २०२० पासून  तब्बल १५ वेळा त्यांनी पत्रव्यवहार केला होता  मृत  शिवदास ढवळे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व नांदेडचे उपवनसंरक्षक याना  16 मार्च रोजी निवेदन दिले होते त्यात  28 एप्रिल रोजी आत्मदहन करू असा इशारा दिला होता  होते आणि त्याच दिवशी त्यांनी स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले   या घटनेची जिल्ह्यात खळबळजनक उडाली   माळाकोळी पोलिस ठाण्यात  त्यांचा  मुलगा जनार्दन शिवदास ढवळे यांच्या फिर्यादीवरून माजी जि प सदस्य देविदास गीते २) सुदमता देविदास गीते( ,पत्नी) ३) सदाशिव देविदास गीते ( मुलगा) ४) ज्ञानेश्वर देविदास गीते (मुलगा) ५) गोविंद हरिश्चंद्र केंद्रे( भाचा)६) सटवा सांगळे सर्व राहणार चौंडी ता लोहा यांच्यात विरुद्ध भादवि कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता यात आणखी एक गुन्हा वाढविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.          

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ इटनकर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी मयत ढवळे यांच्या कुटुंबाची भेट घेतली सांत्वन केले आरोपी तात्काळ अटक करू , चौकशी होईल असे आश्वासित केले.वनविभागाकडून या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे असे सांगण्यात आले तब्बल पाच  दिवसानंतर माळाकोळी पोलिसा या संवेदनशील घटनेत  2 मे रोजी रात्री उशिरा फक्त  दोन आरोपी  अटक केले .. गोविंद हरिश्चंद्र केंद्रे व ज्ञानेश्वर देविदास  गीते अशी  अटक  केलेल्या आरोपींची नावे आहेत  
बाकीचे फरार आहेत पोलिसांना सहा दिवस झाले अद्याप सापडले नाहीत त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली प्रकरणात पोलिस विभागातील कर्मचारी व वन विभाग यांना त्यांचे वरिष्ठ अभय देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.