शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारण्यासाठी नांदेड गुरुद्वारात अरदास !(प्रार्थना )

नांदेड,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कोविड चाचणी  सकारात्मक आली आहे. त्यामुळे नांदेड येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष  लखनसिंग  लांगरी यांनी गुरुद्वारा तखत सचखंड हजूर साहेब या पावन स्थळी उपस्थित होऊन  शरद पवार यांच्या प्रकृतीत  सुधारणा होण्यासाठी अरदास (प्रार्थना ) केली.

Displaying Screenshot_20220125-191221_WhatsApp.jpg

 मंगळवारी सायंकाळी तखत सचखंड गुरुद्वारातील मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंग यांच्या तर्फे वाहेगुरुचे स्मरण करून अरदास विधी पार पाडण्यात आला. सरदार लखनसिंग  लांगरी यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रार्थना केली की मागील सात दशकापासून शरद पवार हे  देश, राज्य आणि सामान्य माणसांच्या सेवेसाठी सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या विस्तारासाठी व समृद्धी  साठी त्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन कायम आहे. पक्ष समृद्धी आणि विस्तारासाठी शरद पवार यांना  उत्तम आरोग्य आणि दीर्घ  आयुष्य प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.