वैजापूर तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वैजापूर ,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रीय मतदार दिन मंगळवार रोजी येथील तहसील कार्यालयात विविध कार्यक्रमांनी झाला.

तहसीलदार राहुल गायकवाड व निवडणूक नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रशिक्षक धोंडीरामसिह राजपूत यांनी  राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदारांसाठीच्या प्रतिज्ञाचे वाचन केले. यावेळी मतदारांना नवीन ओळखपत्राचे  वाटप करण्यात आले.कोरोना नियमांचेपालन करून हे कार्यक्रम घेण्यात आले.

याप्रसंगी  तहसील निवडणूक विभागाचे योगेश पुंडे, प्रवीण पंडित,नितीन गवळी, रामेश्वर कांबळे, पेशकार पेटारे, सुनील विश्वासू, राजेंद्र आव्हाड, दिलीप राजपूत, उल्हास टाकळकर,मथुरा जाधव यांच्यासह शहर व तालुक्यातील मतदार उपस्थित होते.