तहसीलदारांचा बोटीतून प्रवास,वाळू चोरट्यांची पळापळ ..!

लोहा ,२६एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोनामुळे समाज मन भयभीत असतानाच गोदा काठावर नदी पत्रातून बेसुमार वाळू उपसा व तस्करी करणाऱ्यांनी उच्छाद घातला आहे..ना कोरोनाचा भय..नाही काही होईल याची भीती..लक्ष्य  फक्त वाळू चोरी रोखणे..त्यासाठी जीव धोक्यात घालून तहसीलदार विठ्ठल परळीकर व त्यांच्या सहकारी टीमने पेनूर – भारसावडा असा  बोटीतून प्रवास केला…. आणि २५ तरफे जाळले…एका हायवा वर कारवाई  केली..अलीकडच्या काळात  एका दशकातील  या भागात बोटीतून झालेली ही पहिलीच कारवाई ..!   

गोदावरी नदीच्या काठावरील बेट सांगवी, कपिलेश्वर, शेवडी, पेनूर , अंतेश्वर, भारसावडा , चित्रावाडी या भागात बेसुमार वाळूचा उपसा केला जात असतो दरवर्षी या भागातून किमान तीनशे – चारशे हायवा दिवसाकाठी वाळूची वाहतूक करीत असाव्यात .वाळूची तस्करी करणारी मोठी टोळी असून महसूल व पोलिस प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण”  संबध हेच वाळूच्या चोरीचे मूळ होय .पण याला काही  महसूल अधिकारी अपवाद असतात .     कोरोनाचा एकीकडे कहर सुरू आहे.रुग्ण व नातेवाईक बेड साठी, कोणी रेमडिसिव्हर साठी, कोणी ऑक्सिजन साठी परेशान  तर काही जण कुटुंबातील सदस्य , नातेवाईक गेला म्हणून परेशान आहेत असे भयावह चित्र एकीकडे तर दुसरीकडे गोदावरी पात्रातील वाळू कशी उपसावी.. त्याची चोरी करून हायवा जास्तीत जास्त रुपयाला कशी विकेल यासाठी रात्रंदिवस भटकंती वर आहेत .

या वाळू तस्करीला  आळा घालण्यासाठी तहसीलदार परळीकर त्याचे सहकारी नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार अधिक मोकले, मंडळ अधिकारी, तलाठी हे कोरोनाच्या भयभीत काळाची पर्वा न करता गोदा काठावर रात्रभर फिरत आहेत..डोळ्यात तेल गजळून  नदीपात्रातील वाळू उपसा रोखण्यासाठी..     रविवारी सुट्टीचा दिवस..त्या आधी एक दिवस कणकण वाटतयं म्हणून ..कोरोना टेस्ट साठी स्वॅब दिलेला.कुटुंब विलगिकरणात ..तसा .मानसिक ताणतणाव ..पण  हे सगळं बाजूला सारून  तहसीलदार परळीकर आपल्या ड्युटीवर निघाले .. नायब तहसीलदार अशोक मोकले जे की कोरोना आजारातून नुकतेच बाहेत पडलेले पण अंगात थकवा असून ही ड्युटीसाठी तयार …, मंडळ अधिकारी कठारे, पेनूरचे तलाठी परशराम जाधव , शेवडीचे तलाठी मारोती कदम, अशी सोबत  टीम पेनूर, अंतेश्वर, भारसावडा , चित्रावाडी कडे निघाली..     

नदीपात्रातून तरफ्याने वाळू उपसा केला जात होता..या काठावरून पल्याड काठा पर्यन्त कसं जाणार..? वाहनाने ..पायाने जाई पर्यन्त वाळू उपसा करणारे फरार..होतात हा अनुभव पाहता स्वतः तहसीलदार विठ्ठल परळीकर व त्यांचे सहकारी यांनी नावड्याला बोलावले व नदीपत्रातून बोटीने तरफ्याच्या दिशेने कुच केली.त्यांना पाहताच वाळू काढणारे तरफे सोडून पळाले ही कार्यवाही सकाळी दहा वाजता सुरू झाली ते सांयकाळी   पाच  वाजेपर्यंत .इतकावेळ जवळपास पाच किलोमीटर नदीपात्रातून प्रवास करत तहसीलदार परळीकर व टीमने २५ तरफे जाळले.. तसेच एका हायवा गाडी वर कार्यवाही केली..बोटीतून प्रवास करीत तहसीलदार यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे वाळू चोरट्यांची पळापळ सुरू झाली.हायवा जप्त करण्यात आला या प्रकरणी सोनखेड पोलिसाना कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार यांनी  दिले आहेत.. वाळू उपसावर कठोर कारवाईचे संकेत महसूल पथकांनी दिले