औरंगाबाद शहरात २ लाखांपेक्षा जास्त लसीकरण

जिल्ह्यातील 389908 जणांचे कोविड लसीकरण

औरंगाबाद ,२५ एप्रिल /प्रतिनिधी –

आज दि 25 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकूण 800 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 652 तर शहरी भागातील 148 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण 389908 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असून असल्याचे जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ महेश लड्डा यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे. दि.25 एप्रिल 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 173133 जणांनी पहिला डोस तर 13972 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 187105 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 170925 जणांनी पहिला डोस तर 31878 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 202803 जणांचे लसीकरण झाले आहे.