ब्रेक द चेन नियमांच्या अंमलबजावणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 115 टीम

औरंगाबाद ,२२एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोना संसंर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक  नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे  गरजेचे असून त्यादृष्टीने   कोविड निरिक्षकांनी , परीक्षकांनी काम करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

Displaying 1.jfif

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी वार्ड निहाय निवडलेल्‍या कोविड निरिक्षकांची व कोविड परीक्षकांची आढावा बैठक  झाली.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, संजय जाधवर आरोग्य विभागाच्या उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रिता मैत्रेवार, मंदार वैद्य, डॉ. नीता पाडळकर,पूजा पाटील फुलंब्री, आर. आर. रोडगे औरंगाबाद, एस. मोरे पैठण एम. बी.आहेर वैजापूर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी औषधा व्यतिरिक्त इतर साहित्य विकणाऱ्या मेडिकल्सवर कारवाई करण्याचे आदेश  दिले.तसेच  साबणाच्या पाण्याने ऑक्सिजन लाईन तपासण्याचे सूचित करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लसीकरणाचा वेग वाढवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या.

 तसेच ब्रेक द चेन नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात 115 टीम कार्यरत असून भाजीमंडई, दुकाने,नाश्ता सेंटर,ज्यूस,हॉटेल,परमिट रूम, बार,पेट्रोल पंप, धार्मिक स्थळे,वाहतूक सुविधा या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे. गावा गावात तरुणांच्या बैठका घेऊन त्यांना कोरोना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यावे ‘आपल्यासारखे समाजसेवक दुसरे कुणीच नाही’ हे समजून झोकून देऊन काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

यावेळी लसीकरण,ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,हॉस्पिटल्स,बेड आणि कोरोना नियमांचे पालन इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला.