समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होण्याची गरज- लता मुळे

औरंगाबाद, २०ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कोविड-१९ या वैश्र्विक महामारीच्या शासन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सोशल डिस्टंसिंग व इतर सर्व खबरदारी घेत सरकारी नियमांचे पालन करीत इनरव्हील क्लब औरंगाबादच्या वतीने सोमवार, दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध आदर्श ग्राम पंचायत, पाटोदा, ता. गंगापूर येथे  शल्य रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते, शिबिराचे उद्घाटन इनरव्हील क्लब, औरंगाबाद अध्यक्ष लता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Displaying lata padmakar mulay.jpg
इनरव्हील क्लब, औरंगाबाद अध्यक्ष लता मुळे

यावेळी लता मुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की  स्थानिक नागरिकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक गरिब व गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत व ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा इनरव्हील क्लब औरंगाबादचा निर्धार आहे. गरिब व गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देत आहोत. नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, म्ह्णून अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील. असे आश्वासित करण्यात आले. ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्तितीमुळे नागरिकांना औषध उपचार मिळत नाहीत म्हंणून शल्य रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबीर घेत आहोत. नागरिक स्वतःला विकार असून देखील तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात नाही.  अशावेळी जनजागृती करून त्यांची तपासणी करणे गरजेचे असते , तरच पुढील उपचार वेळेवर मिळू शकतात असेही लता मुळे म्हणाल्या.   

Displaying 04.jpg

                     

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श ग्राम पंचायत, पाटोदा सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच तथा युवा नेते कपिद्र पेरे पाटील उपस्थित होते. शिबीरात जवळपास १२० शिबीरार्थीनी उपस्थिती लावली. शिबिरामध्ये विषेश उपस्थिती महिला व ज्येष्ठ नागरिकांची उल्लेखनीय होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली.

Displaying 03.jpg

यावेळी इनरव्हील क्लब, औरंगाबाद सचिव वर्षा पटेल, उपाध्यक्ष छाया भोयर, ऊषा धामणे, माधुरी अहिरराव, हिरा पेरे पाटील, पुष्पा राणा, ललिता बोरसे व  ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, इनरव्हील क्लब सदस्य, CSMSS आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय डॉक्टर, नर्स आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.