रुग्णांची लूट होणार नाही याची खबरदारी लेखापरीक्षकांनी घ्यावी

कोवीड उपचारांच्या देयक  तपासणीचा अहवाल लेखापरीक्षकांनी नियमित सादर करावा-  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Displaying _DSC2486.JPG

औरंगाबाद ,२२एप्रिल /प्रतिनिधी -कोवीड उपचार वाजवी दरात खासगी रुग्णालयांनी करणे बंधनकारक असून त्यांच्या कडून योग्य दरानेच देयक आकारले जात आहे का याची काटेकोर तपासणी लेखापरीक्षकांनी करून त्याचा अहवाल नियमित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

कोवीड उपचारासाठी शासनाचे धोरण व वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगी रुग्णालयांनी देयक आकारणे बंधनकारक असून औरंगाबाद जिल्हयातील खाजगी रुग्णालयांकडून आकारली जात असलेली देयके ही अवाजवी स्वरुपात आकारली जाऊ नये,  म्हणून सदर देयकांची तपासणी करण्यासाठी  जिल्हाधिकारी  यांच्या आदेशान्वये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली  आहे.या लेखापरीक्षकांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देश दिले.

जिल्हाधिकारी यांच्या द्वारा निर्गमित या आदेशान्वये  सर्व संबंधीत लेखपरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या खाजगी रुग्णालायात (DCHC/DCH) कोवीड  19 च्या रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या रुग्णालयांच्या देयकाची तपासणी करावयाची आहे. सर्व संबंधीत लेखपरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या खाजगी रुग्णालायात (DCHC/DCH) दाखल असलेल्या कोवीड  19 रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर अथवा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक रुग्णांस आकारण्यात आलेल्या देयकाची तपासणी करावयाची आहे. रुग्णालयांनी त्यांचेकडील कोवीड 19 रुणांना डिस्चार्ज  दिल्यानंतर अथवा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या देयकाची रुग्णनिहाय संपूर्ण माहिती रुग्णांचे नाव, रुग्णाचा एसआरएफ आयडी, रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधी, बिलाची एकूण रक्कम डिस्चार्ज / मृत्यू, शेरा  या नमुन्यात ही माहिती रोज सादर करावयाची आहे.

खालील नमूद अधिकारी यांनी समन्वयक अधिकारी, श्री.बी.एस.नाईकवाडे, सहायक संचालक समाज कल्याण औरंगाबाद व श्री.एस.आर. चाटे, लेखा अधिकारी, लेखा परीक्षा स्थानिक निधी अधिकारी औरंगाबाद यांचेशी संपर्क साधून कामकाजाचा देनंदिन अहवाल सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत सादर करावा. तसेच सहायक लेखा अधिकारी यांनी साप्ताहिक लेखा परीक्षण अहवाल प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास न चुकता सादर करावा असे संबंधित आदेशात नमूद असल्याचे जिल्हाधिकारी कार्यलयाने कळविले आहे. रुग्णालयनिहाय नियुक्त करण्यात आलेले लेखापरिक्षक अधिकारी खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.अधिकाऱ्याचे नावहॉस्पीटलचे नाव व पत्तासंपर्क क्रमंक
1)श्री.संजय अमृतवारमहात्मा गांधी मिशन रुग्णालय, सिडको, औरंगाबाद9850023633
श्री.एस.पी.पडलवार9421489554
2)री.एस.एम.खरातकमलनयन बजाज रुग्णालय, सातारा परिसर, औरंगाबाद9082085195
श्री.राजेंद्र तारो9921027507
3)श्री.के.आर.चोरमारेडॉ.हेडगेवार रुग्णालय, गारखेडा परिसर औरंगाबाद9850604944
श्री.चैनसिंग राजपूत7972467740
4)श्री.हेमंत जरंगेसेठ नंदलाल धूत रुग्णालय, औरंगाबाद9284689091
श्री.राजू चिते9420812933

5)
श्री.रवींद्र पाटीलयुनायटेड सिग्मा रुग्णालय, शहानूरमियॉ दर्गाह, औरंगाबाद9420557789
श्री.वामन वीर9422230627
6)श्री.गणेश हट्टेएशियन हॉस्पीटल, आकाशवाणी जवळ, जालना रोड, औरंगाबाद9423108109
7)श्री.एम.डी.जाधवमाणिक हॉस्पीटल, गारखेडा परिसर, औरंगाबाद9421671585
8)श्री.नरेंद्र सोनवणेजे.जे.प्लस हॉस्पीटल, अदालत रोड, औरंगाबाद8668471322
9)श्री.आर.के.बोरकरसावंगीकर हॉस्पीटल, एन-2, सिडको, औरंगाबाद0240-23701390240-2370238
10)श्री.नंदकिशोर चिंचखेडकरएमआयटी हॉस्पीटल, एन-4, सिडको, औरंगाबाद8830968616
11)श्री.विशाल शास्त्रीलाईफलाईन हॉस्पीटल, बीड बायपास, औरंगाबाद7588521971
12)श्री.एस.एस.काळूसेओरीएन सिटी केअर हॉस्पीटल, संत एकनाथ मंदिराजवळ, औरंगाबाद9511232643
13)श्री.राजू पतंगराव शिंदेसुमनांजली हॉस्पीटल, जालना रोड, औरंगाबाद0240-2402391
14)री.अमीर खान पठाणएम्स हॉस्पिटल, जळगाव रोड, औरंगाबाद9421680589
15)श्री.व्ही.एन.राजेंद्रॲपेक्स हॉस्पीटल, बायजीपूरा, औरंगाबाद9422653168
16)श्री.गौतम कुचेकरवाय.एस.के.हॉस्पीटल, सिडको, औरंगाबाद9403493778
17)श्री.मुंजाजी डहाळे1)     एकविरा हॉस्पीटल, औरंगाबाद,2)     वुई केअर हॉस्पीटल औरंगाबाद8007618777
18)श्री.एस.टी.गोरेजी.आय.वन हॉस्पीटल, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद9420920544
19)श्री.संजीव बनसोडेहयात मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, औरंगाबाद8830765546
20)श्री.बि.के.जमधडेन्यु लाईफ बालरुग्णालय आणि क्रिटीकल केअर सेंटर औरंगाबाद8999614630
21)श्री.एस.एस.ढगेअंजिठा हॉस्पीटल, मौलाना आझाद कॉलेज जवळ, औरंगाबाद8275322841
22)श्री.एम.ए.थोरातकृष्णा हॉस्पीटल औरंगाबाद9275515789
23)श्री.पी.एस.वैराळकरराखीव पथक क्रमांक-19890123695
24)श्री.सुदामराव रामराव मेडशीकरराखीव पथक क्रमांक-29422920578
25)श्री.डी.डी.टाकसाळेराखीव पथक क्रमांक-39423157558
26)श्री.ठेणगेराखीव पथक क्रमांक-4