लातूर जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून घेण्यासाठी परवानगी द्यावी -आमदार ज्ञानराज चौगुले

उमरगा ,१६ एप्रिल /प्रतिनिधी 

उमरगा-लोहारा तालुक्यातील रुग्णांसाठी लातूर जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून घेण्यासाठी परवानगी द्यावी  अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे . 

Maharashtra: Oxygen cylinders demand goes up 3-fold in Aurangabad


उमरगा व लोहारा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह व इतर गरजू रुग्णांना उमरगा येथील जनसेवा गॅस एजन्सी द्वारे ऑक्सिजन गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जात असून ही एजन्सी जिल्ह्यातील तामलवाडी येथील गोरज गॅसेस, कंपनीकडून गॅस रिफिल करून घेते. 
परंतु *गोरज गॅसेस* हे अत्यंत कमी क्षमतेचे *लिक्विड ऑक्सिजन प्लांट असून सध्याची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, उमरगा व लोहारा तालुक्यातील शासकीय व खाजगी (कोविड-19)  रुग्णालयांत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन गॅस उपलब्ध होत नाही. तसेच पोस्ट कोविड रुग्ण, अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या (विशेषतः नवजात बालके) यांनाही आवश्यकतेनुसार पुरवठा करणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे डॉक्टर्स व रुग्णांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 
यामुळे उमरगा येथील जनसेवा गॅस एजन्सीने लातूर येथील गॅस एजन्सीमधून दररोज किमान 50 जम्बो ऑक्सिजन गॅस सिलिंडर रिफिल करून मिळण्यासाठी परवानगी मागितलेली आहे.
तरी उमरगा -लोहारा तालुक्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने लातूर येथील एजन्सीकडून ऑक्सिजन गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी परवानगी देणेबाबत जिल्हाधिकारी,  लातूर यांना सूचना कराव्यात अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.