नांदेड जिल्ह्यात 43 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

105 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 30 :- शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 105 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 299 अहवालापैकी 1 हजार 226 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 70 एवढी झाली असून यातील 17 हजार 822 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 600 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 41 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात तीन बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी बाफना रोड नांदेड येथील 61 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, वजिराबाद नांदेड येथील 59 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 38 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 507 एवढीच आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 13 हजार 94निगेटिव्ह स्वॅब- 90 हजार 339एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 70एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 822एकूण मृत्यू संख्या- 507उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.74 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 391रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 600आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 41.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.