औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आयोजित सभेस अटी व शर्तीचा अधीन राहून परवानगी

औरंगाबाद, दि.31, (जिमाका) :- शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. परंतु सध्‍या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव विचारात घेता. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.औरंगाबाद यांनी बँकेच्या नवनिर्वाचित समिती सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेस खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे, जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

हॉलमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान 6 चौरस फुट (दो गज की दूरी ) या प्रमाणात बैठक व्यवस्था करावी,सदरील सभा आयोजित करणारे आयोजक, साधन व्यक्ती, सुरक्षा रक्षक इ.नी जवळच्या मनपा/स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत RT-PCR Test (before 72 hours) करणे बंधनकारक राहील, RT-PCR Test न केल्यास व सभेस उपस्थित राहील्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी अध्यासी अधिकाऱ्याची राहील,संबंधित सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधकारक राहिल.तसेच सदरील ॲपमध्ये संबधिताची नाव  नोंदणी झाल्याबाबतची खात्री सभेच्या आयोजकांनी करावी, कोविड-19 अंतर्गत केंद्र शासन/राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहिल, कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी Social Distancing पाळून भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी, तसेच अध्यक्ष व उपाध्याक्षांची निवड झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे विजयी मिरवणूक/विजयी मेळावा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी,सर्वसाधारण सभेचा हॉल सभेपूर्वी व सभेनंतर Sodium Hypochlorite च्या द्रावणाने सॅनीटाईज करणे बंधकारक राहिल, सर्वसाधारण सभेच्या प्रवेशाच्या वेळी सॅनीटाईजरची किंवा साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी, कोविड 19 साथरोग संबधी, सर्दी,खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश देवू नये, शक्यतो संबंधित सर्वांनी हॅण्डग्लोजचा वापर करावा तसेच मास्क/फेसकव्हर लावणे बंधनकारक राहिल,सर्वसाधारण सभेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान (Thermal Screening) o O2 level याची Pulse Oxymeter वर नोंद घेऊन नोंदवहीमध्ये नोंद करावी, सभेच्या वेळी सभा हॉलमध्ये प्रवेशाची व सभा संपल्यानंतर बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कारावी, मास्क लावलेल्या व्यक्तीनाच सभा हॉलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दयावी (No Mask-No Entry), केवळ Asymptomatic व्यक्तीनाच सभेसाठी प्रवेश द्यावा 60 वर्षावरील व्यक्तीना सभेसाठी प्रवेश देवू नये, कोविड-19 शी संबंधित वेळोवेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, आदेश, निर्णय व या कार्यलयाचे आदेशाचे पालन करण्यास कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थेत जबाबदार धरून तात्काळ संस्था सील करण्यात येईल.

वरील अटी शर्तींचे पालन न करणारी संस्था अथवा समुह, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती यांनी साथरोग प्रतिधंक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानूसार कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.