नियोजनशून्य प्रशासनाचा व सरकारचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध


औरंगाबाद, दिनांक 27 : महाराष्ट्रा मध्ये आता कुठे अर्थव्यवस्थेची चक्रे फिरत होते,त्याची सुरुवात गतिमान होत असताना गोरगरीब,वंचित, उपेक्षित,कामगार,मध्यम वर्ग सावरत होते, त्याला खिळ घालण्याचे काम,पुन्हा राज्यसरकारने व प्रशासनाने केले,जनतेला व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता,लॉकडाऊन जाहीर केला,

औरंगाबादमध्ये खूप मोठया प्रमाणामध्ये कामगार वर्ग काम करतो, व्यापारी वर्ग व्यापार करतात,व सरकारला कर देतात, त्या वर्गाच्या आर्थिक दृष्टिकोनातून ,विचार न करता त्यांच्या रोजीरोटीचा पोटापाण्याचा विचार न करता,प्रशासनातील काही ठराविक अधिकारी मनमानी पद्धतीने वाटेल तसे निर्णय घेतात, व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री जनतेच्या आर्थीक सामाजीक स्थितीचा कसलाही विचार नकरता ,त्याना कुठली आर्थीक मदत,सवलत देत नाहीत.त्यामुळे (मिशन बिगिन अगेन) पुन्हश्च सुरुवात या मध्ये खऱ्या अर्थाने,सर्व सामान्यांचे जीवनमान,अर्थचक्र सुधारणेच्या स्थितीत असताना, सरकार सक्षम योजना करायचे सोडून, सरकार मात्र व्यापारी,कामगार ,मध्यम वर्ग,उद्योजक या सर्वांना आर्थिक संकटात टाकत आहे.मध्यमवर्गाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेणे,कामगार वर्गाच्या हलाखीच्या स्थितीचे अभ्यास न करणे,त्याचे नियोजन न करणे, लॉकडाऊन च्या काळामध्ये अनेक लोकांनी जमापुंजी वापरून आपले, जीवन कसेतरी चालवले, आता मात्र मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक स्थितीमुळे कंबरडे मोडले,या स्थितीला कसे तोंड द्यायचे,याचा विचार करत असतानाच सरकार अचानकच लॉकडाऊन जाहीर करते, आजच्या स्थितीला शाळा, महाविद्यालय, घरगुती जीवनावश्यक गरजा, त्याच्यासाठी पैसा लागतो, त्यासाठी मध्यम वर्ग व्यक्ती काम करते,त्यांचे जीवन आज संकटात आहे, मागील एक वर्षांमध्ये महा विकास आघाडी सरकारने व त्यांच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मध्यमवर्ग,कामगार,व्यापारी यांना मदत केली नाही, त्यामुळे आज हालाखीची स्थिती आहे, विशिष्ट लोकांना हाताशी धरून सरकार व प्रशासन अधिकारी लॉकडाऊन जाहीर करतात,ते सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,यांना विश्वासात घेत नाहीत, त्या मुळे भारतीय जनता पार्टी शहरजिल्हाअध्यक्ष संजय केनेकर यांनी या नियोजन शून्य लॉकडाउनचा जाहीर निषेध केला आहे.