नांदेड जिल्ह्यात 1 हजार 310 व्यक्ती कोरोना बाधित ; 18 मृत्यू

नांदेड दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 28 मार्च 2021 रोजी 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 299 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 576 तर अँटिजेन तपासणीद्वारे 734 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 310 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 39 हजार 908 एवढी झाली आहे.

गुरुवार 25 मार्च 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे चिखलवाडी नांदेड येथील 74 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 26 मार्च रोजी सिद्धीविनायक अपार्टमेंट नांदेड येथील 58 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील चितळी येथील 60 वर्षाची महिला, इंदिरानगर लोहा येथील 55 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 25 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, तरोडा बु नांदेड येथील 76 वर्षाचा पुरुष, बळीरामपुर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, होळी नांदेड येथील 82 वर्षाचा पुरुष, तर शनिवार 27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हिंगोली नाका नांदेड येथील 29 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 52 वर्षाचा पुरुष, आंबेडकरनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, भगतसिंगरोड नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, गुरुद्वारा गेट नंबर 4 नांदेड येथील 50 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे दिलीपसिंग कॉलनी नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील पाथरड येथील 60 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 50 वर्षाची महिला तर पुर्णारोड नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 731 एवढी झाली आहे.

आजच्या 4 हजार 299 अहवालापैकी 2 हजार 850 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 39 हजार 908 एवढी झाली असून यातील 29 हजार 273 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 670 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 559, किनवट कोविड रुग्णालय 3, कंधार तालुक्यांतर्गत 9, धर्माबाद तालुक्यांतर्गत 9, देगलूर कोविड रुग्णालय 47, मुखेड कोविड रुग्णालय 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 11, हदगाव कोविड रुग्णालय 7, बिलोली तालुक्यांतर्गत 12, भोकर तालुक्यांतर्गत 5, माहूर तालुक्यांतर्गत 20, मांडवी तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 40 असे एकूण 755 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.35 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 1 हजार 387एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 55 हजार 87एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 39 हजार 908एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 29 हजार 273एकुण मृत्यू संख्या-731उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.35 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-128आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-398रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 670आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-108.