इतर धोक्यात असताना कोणीही एक सुरक्षित राहू शकत नाही, हे कोविड 19 महामारीने शिकवले – राष्ट्रपती कोविंद


कर्नाटक येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपतींची उपस्थिती

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021


कोविड-19 महामारीने जगाला एक गोष्ट शिकविली की, इतर धोक्यात असताना आपण सुरक्षित राहू शकत नाही, असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले. ते बेंगळुरू येथे कर्नाटकमध्ये राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात आज (7 फेब्रुवारी 2021) संबोधित करत होते. सबंध शतकापेक्षा जास्त काळामधील पहिल्या मोठ्या महामारीने आपल्याला सार्वजनिक आरोग्याबाबत येणाऱ्या संकटांसाठी  तयार राहण्यास शिकविले आहे. कोविड 19 सारखे दुर्मिळ वाटणारे हे एक आरोग्य संकट क्वचितच घडत असल्यासारखे दिसत असले तरीही, शास्त्रज्ञांच्या एका गटाने आपल्याला पुढे अशा प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. जगाने यातून एक चांगला धडा शिकला आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोविडनंतरच्या परिस्थितीमध्ये जगाला सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत अधिक सतर्कता पाळावी लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले.  

पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना, राष्ट्रपती म्हणाले की, हे  उदात्त कार्यक्षेत्र या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे, ज्यामध्ये त्यांना मानवतेची सेवा करण्याची अकल्पित आणि अभूतपूर्व संधी आहे. त्यांना मिळालेल्या संधीचा ते कशाप्रकारे उत्तम वापर करतात, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या केंद्रिय अर्थसंकल्पात, `आरोग्य आणि कल्याण` हे आत्मनिर्भर भारताच्या सहा महत्त्वपूर्ण स्तंभांपैकी एक म्हणून ओळखले गेले आहे. देशातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यावर भर दिला जात आहे. या राष्ट्रीय संपत्तीचा परिणामकारक उपयोग केवळ त्यांच्या सक्रिय पाठिंब्याने आणि योगदानाने शक्य होऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाले की, भारतातील आरोग्य सेवा वितरणाच्या सर्व टप्प्यांमध्ये जसे की – प्रतिबंध, निदान आणि उपचार यामध्ये बदल घडण्याच्या तयारीत आहेत. आरोग्य सेवा क्षेत्रातील कोणतीही एकल संस्था हा परिणाम देऊ शकत नाही आणि तो साध्यही करू शकत नाही. या क्षेत्राच्या उत्क्रांतीमध्ये सर्व भागधारकांचा सक्रीय सहभाग आणि हेतूच्या योग्य पद्धतीने होणाऱ्या अंमलबजावणीसाठी नाविन्यतेचा वापर आवश्यक आहे.

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे जगातील संलग्न संस्थांच्या असलेल्या सर्वात मोठ्या गटापैकी असलेली जगातील एक संस्था आहे, आणि ती आरोग्य क्षेत्रातील शिक्षणामध्ये अनेक संशोधनांचे प्रतिनिधित्व करते, हे जाणून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, या विद्यापीठाच्या स्थापनेपासून पुढाकार घेतलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावरील विश्वासार्ह ब्रँड म्हणून उदयास आला आहे.