दर्पण दिनानिमित्त विनायकराव पाटील महाविद्यालयात पत्रकारांचा सत्कार 

वैजापूर ,​७​ जानेवारी  / प्रतिनिधी :- आजची पत्रकारिता पुर्णपणे बदलली आहे. प्रसारमाध्यमांचे स्वरुपही बदलत आहे.‌ डिजिटल पत्रकारितेचा उदय झाला असुन केवळ टीआरपीसाठी एखादे वृत्त भडकपणे लोकांसमोर आणण्याचे प्रकार होत आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे पत्रकारांनी सजग राहुन वस्तुनिष्ठ लिखाणाच्या माध्यमातुन समाजातील घटनांचे प्रतिबिंब वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावे अशी अपेक्षा वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी व्यक्त केली.

दर्पण दिनानिमित्त डॉ. थोरे, उपप्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंके, प्रा. डॉ. आबासाहेब कसबे  यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला घनश्याम वाणी, भानुदास धामणे, विजय गायकवाड, प्रशांत त्रिभुवन, सुनिल त्रिभुवन, मोबीन खान, फैसल पटेल, मकरंद कुलकर्णी, बाबासाहेब धुमाळ, दिपक थोरे, दिपक बरकसे, अशोक बोराडे, शैलेंद्र खैरमोडे, अमोल राजपूत, किरण त्रिभुवन, डॉ.‌हरेष साबणे, गौरव धामणे, मन्सुर आली, रियाजोद्दीन शेख, विलास म्हस्के, जीवन पठारे, विशाल त्रिभुवन, राहुल त्रिभुवन, अजय राजपूत उपस्थित होते.