बी.डी.एस.परीक्षेत प्रथम आलेल्या डॉ. यशश्री श्रीकांत देशमुख सुवर्ण पदकाने सन्मानित

औरंगाबाद, २६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी घेतलेल्या परीक्षेत छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची बी. डी. एस. विद्यार्थिनी  डॉ. यशश्री श्रीकांत देशमुख हिने ८१.६६ टक्के मार्क घेऊन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मानाचं सुवर्णपदक पटकावले आहे.  

          नुकताच औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार रुग्णालयामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (रिटायर्ड/PVSM, AVSM, VSM) यांच्याहस्ते डॉ. यशश्री श्रीकांत देशमुख हिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

    डॉ. यशश्री श्रीकांत देशमुख दहावीला असताना उत्कृष्ठ विद्यार्थिनी म्हणून तर बी. डी. एस. असताना अनेक राज्यस्तरीय विविध स्पर्धत अनेक पारितोषिके प्राप्त केले आहे आणि टाटा हेल्थ

अँड मेडिकल सायन्स रिसर्चनी रुपये १,११,००० ची स्कॉलरशिप देऊन तिचा गौरव करण्यात आला. तिने दररोज आठ ते दहा तास अभ्यास करून हे यश प्राप्त केले आहे. 

     सत्कार प्रसंगी लेफ्टनंट जनरल डॉ. राजीव  कानिटकर (रिटायर्ड), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व्यवस्थापन कमिटी सदस्य डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. अनंत पंढरे आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते.

               तिच्या यशाचे कौतुक आणि अभिनंदन छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष श्री. रणजित मुळे, सचिव श्री. पद्माकर मुळे, दंत महाविद्यालय आणि रुग्णालय संचालक डॉ. सुभाष भोयर, प्रभारी अधिष्ठाता डॉ. लता काळे, डॉ. जयश्री देशमुख आणि दंत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी केले आहे.