वैजापूर दौऱ्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
वैजापूर,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज वैजापूर भेटीत स्वराज ट्रॅक्टर्स वितरण सोहळा व शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून त्यानंतर महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
आजच्या वैजापूर दौऱ्यात दानवे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, उपतालुकाप्रमुख मोहनराव साळुंके, रमेश सावंत, सिताराम भराडे, विठ्ठल डमाळे, मनोज गायके यांच्या समवेत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक आनंदीताई अन्नदाते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
त्यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांच्याही निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष मलिक काझी, मर्चंट बँकेचे संचालक विजय दायमा,जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, सुनील बोडखे, सोमनाथ मगर,हिरेष लाडवाणी यावेळी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची चिकटगावकर कुटुंबियांशी सांत्वनपर भेट
चिकटगाव येथे जाऊन माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व अभय पाटील चिकटगावकर व त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.