विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांच्या हस्ते आरतीने औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा यात्रेला सुरुवात

औरंगाबाद,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-सुमारे ३५० वर्षांचा इतिहास असणारे औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत  कर्णपुरा देवी यात्रेला आज सोमवार (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात झाली प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी यात्रेची जय्यत तयारी केली.

May be an image of 2 people and people standing

नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रथम दिनी पहाटे ३:०० वाजता विधीवत महापूजा, ७:०० वा. महाआरती, ७:१५ वा. घटस्थापना  हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती व घटस्थापना करून विधिवत  पूजन करून करण्यात आली.

May be an image of 1 person, sitting and standing

नऊ दिवस धार्मिक उत्सवा बरोबरच भाविकांसाठी जागरण गोंधळ विविध  कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले संतोष दानवे,संतोष मरमठ,राजेंद्र दानवे,राजू राजपूत,अभिजीत पगारे,पराग कुंडलवाल,लक्ष्मण बताडे, जगन्नाथ दानवे, आकाश दानवे,नंदू लबडे,नारायण कानकाटे,प्रभात पुरवार,पोपटराव दानवे,अंबादास भानुदास दानवे,अनिल दानवे आदी भाविक भक्तगण माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.