वैजापूर पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालय राज्यस्तरीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित

वैजापूर,१२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- नगरपालिका व महानगरपालिका  शिक्षण संघाच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सर्वोच्च शिक्षण गुणवत्ता पुरस्कार यावर्षी वैजापूर नगरपालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयाला मिळाला. अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात  आला.

या अनुषंगाने सोमवारी मौलाना आझाद शाळेचे  मुख्याध्यापक जी.जी. राजपूत व सर्व शिक्षकांचा नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गटनेते नगरसेवक दशरथ बनकर, पालिकेचे माजी शिक्षणाधिकारी  धोंडिरामसिंह राजपूत, सोमु सूर्यवंशी, एम.आर. गणवीर यांची उपस्थिती होती.

मौलाना आझाद शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळात ही सर्व नियम पाळत शाळा केली. विद्यार्थ्यांची गळती थांबवून शंभर टक्के पट नोंदणी व प्रवेश केला तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी तांत्रिक शैक्षणिक साधने, विविध शालोपयोगी उपक्रम सातत्याने राबवून शैक्षणिक गुणवत्ता समृद्धी विकास करून घेण्यात यशस्वी प्रयत्न केले. याची दखल घेत पालिका व महानगरपालिका राज्य संघाने दखल या शाळेची राज्यस्तरावर निवड केली. या अभिनंदन सोहळ्यात बी.बी.जाधव, संदीप सखासे पाटील,वराजश्री बंड, सुवर्णा बोर्डे, लता सुखासे, सुनीता वसावे, वैशाली पगारे,ज्योती दिवेकर, श्री. रावकर, श्री. राठोड यांची उपस्थिती होती. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे माजी नगराध्यक्ष साबेर खान, डॉ.दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, धोंडिरामसिंह राजपूत आदींनी अभिनंदन केले आहे.