वैजापूर ग्रामीण -2 ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अंगणवाडी इमारतीचे आ. बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ग्रामपंचायत वैजापुर ग्रामीण-2 साठी जनसुविधा योजने अंतर्गत मंजुर झालेल्या अंगणवाडी इमारत बांधकामाचे लोकार्पण रविवारी (ता.23) आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरभाई, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप,  अंकुश पाटील हिंगे,  माजी नगरसेवक राजेंद्र पाटील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास विभागप्रमुख प्रकाश मतसागर, चांगदेव मामा इंगळे, संजय बोरनारे, सरपंच हौसाताई दाणे, उपसरपंच  दादासाहेब अंभोरे, माजी सरपंच डॉ. वंदना इंगळे, सदस्या सिंधूताई शेळके,  मंगलताई इंगळे, वैशालीताई इंगळे, जनाताई मापारी, शरद इंगळे, बाबासाहेब इंगळे, ग्रामसेवक आर. ए.बोबडे, गणेश राहणे, नवनाथ ठोंबरे, रावसाहेब इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, अंगणवाडी सेविका श्रीमती बढे, कैलास नागरे, ज्ञानेश्वर इंगळे, कुलदीप वाणी, कृषीसहायक थोरात साहेब, मगन शिंदे, जगनभाऊ राजपूत, ढाकरे सर, संतोष बंगाळ, वसंत त्रिभुवन, डॉ बाबासाहेब इंगळे, योगेश इंगळे, मंजाहारी शिंदे, दिलीप इंगळे, रावसाहेब इंगळे, भागिनाथ शिंदे, आत्माराम दाणे, अर्जुन शेळके, स्वप्नील गलांडे, बाजीराव मापारी, भरत इंगळे,अरुण वाणी, बाळासाहेब त्रिभुवन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.