वैजापुर ग्रामीण २ च्या उपसरंपचपदी दादा श्रीहरी अंभाेरे पाटील यांची बिनविराेध निवड
वैजापूर,२२ मार्च /प्रतिनिधी :- वैजापुर ग्रामीण २ च्या उपसरंपचपदी दादा श्रीहरी अंभाेरे पाटील यांची सोमवारी निवड करण्यात आली.उपसरंपच गणपत पाटील गंलाडे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त होती. उपसरपंच पदासाठी आज मंडळ अधिकारी तोतला, ग्रामसेवक बोबडे व तलाठी पेहरकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होऊन उपसरपंचपदी दादा पाटील अंभोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. वैजापूर ग्रामीण – 2 चे सरंपच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचासह नागरीक माेठ्या संख्येने उपस्थित होते.